• Download App
    राहुल गांधींवरील आक्षेपार्ह जाहिरातीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा फूड कंपनीत राडा, कोरोनाचे नियम डावलून निदर्शने । congress workers protest foods shop in mumbai For a advertisement mocking sonia gandhi and rahul gandhi

    राहुल गांधींवरील आक्षेपार्ह जाहिरातीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा फूड कंपनीत राडा, कोरोनाचे नियम डावलून निदर्शने

    congress workers protest : कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी स्टोरिया फूड्स या कंपनीत मोठा राडा घातला. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घातलेल्या या गोंधळाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे. मंगळवारी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईतील कंपनीच्या मुख्यालयात स्टोरिया फूड्सच्या जाहिरातीसंदर्भात तीव्र निदर्शने केली. या कंपनीच्या एका जाहिरातीमध्ये कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची खिल्ली उडविल्याचा आरोप कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. या जाहिरातीमुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजीही केली. congress workers protest foods shop in mumbai For a advertisement mocking sonia gandhi and rahul gandhi


    वृत्तसंस्था

    मुंबई : कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी स्टोरिया फूड्स या कंपनीत मोठा राडा घातला. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घातलेल्या या गोंधळाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे. मंगळवारी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईतील कंपनीच्या मुख्यालयात स्टोरिया फूड्सच्या जाहिरातीसंदर्भात तीव्र निदर्शने केली. या कंपनीच्या एका जाहिरातीमध्ये कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची खिल्ली उडविल्याचा आरोप कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. या जाहिरातीमुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजीही केली.

    या आंदोलनाच्या वेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कोरोना नियमावलीला हरताळ फासला होता. यात सहभागी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर मास्कदेखील घातलेला नव्हता. या गोंधळाच्या वेळी कोणत्याही कॉंग्रेस कार्यकर्त्याने सामाजिक अंतराचे पालन केले नाही. दुसरीकडे, कोरोना संकटाविषयी राज्य सरकार मात्र वारंवार नियमांच्या काटेकोर पालनाचा आग्रह धरत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत किंचित घट पाहायला मिळाली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात दररोज 60 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत होती.

    सोमवारी महाराष्ट्राला कोरोनाबाबत काही प्रमाणात दिलासा मिळाल्याच्या बातम्या आल्या आहेत. सोमवारी महाराष्ट्रात 48,700 नवीन रुग्णांची नोंद झाली, ही आकडेवारी पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी होती. राज्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा 43,43,727 वर पोहोचला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार याच काळात राज्यात कोविड-19 मुळे आणखी 524 रुग्णांच्या मृत्यूनंतर एकूण मृतांचा आकडा 65,244 वर गेला आहे.

    congress workers protest foods shop in mumbai For a advertisement mocking sonia gandhi and rahul gandhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य