प्रतिनिधी
मुंबई : अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आडनावावरून वादग्रस्त टिप्पणी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे खरे गांधी नसून ते खान आहेत. त्यांनी एॅफिडेव्हीट करून आडनाव बदलले. ते महात्मा गांधींचे वंशज नाहीत. गांधी आडनावाचा फायदा घेण्यासाठी त्यांनी हे आडनाव घेतलं आहे. ही फिरोज खान यांची पुढची पिल्लावळ आहे, अशी वादग्रस्त टिप्पणी शरद पोंक्षे यांनी केली. congress While criticizing Sharad Ponkshe
त्यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसने नटसम्राट सिनेमातल्या विक्रम गोखले यांच्या तोंडी असलेल्या डायलॉगची कॉपी मारली. नटसम्राट सिनेमात विक्रम गोखले हे नाना पाटेकर या उद्देशून, “नट म्हणून तू भिकारडा आहेसच, पण माणूस म्हणूनही नीच आहेस,” असा डायलॉग म्हटला होता. सिनेमात ती सिच्युएशन फार गंभीर होती. पण सिनेमातल्या त्या डायलॉगची कॉपी करून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शरद पक्ष यांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “शरद पोंक्षे हा अभिनेता म्हणून टुकार तर आहेच, पण माणूस म्हणूनही नीच आहे”, असे ट्विट अतुल लोंढे यांनी केले.
शरद पोंक्षेंच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही टिप्पणी केली. “हा विकृत पोंक्षे अजून काय बोलू शकतो…नथुरामची अवलाद…” असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव येथे भारतीय विचार मंचच्या वतीने शरद पोंक्षे यांचं सावरकरांच्या जीवनावर आधारित व्याख्यान होते. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्या घराण्यावर चौफेर टीका केली. राहुल गांधी हे खरंच गांधी आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांचे आजोबा फिरोज गांधी यांचे मूळ आडनाव खान असल्याचा दावा पोंक्षे यांनी केला. राहुल गांधी हे सावरकरही नाहीत आणि गांधीही नाहीत. राहुल गांधी यांना आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही तर सावरकरांचा इतिहास कसा माहीत असणार, अशी टीका पोंक्षे यांनी केली. शरद पोंक्षे यांच्या या वक्तव्यावरूनच अतुल लोंढे यांनी विक्रम गोखले यांच्या डायलॉगची कॉपी मारून त्यांच्यावर टीका केली आहे.
congress While criticizing Sharad Ponkshe
महत्वाच्या बातम्या
- ‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘सबवे’ नंतर आता ‘बर्गर किंग’ देखील मेनूकार्ड मधून टोमॅटो गेले गायब!
- ”कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना..” राज ठाकरेंचा संताप!
- राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाची शरद पवार आणि अजित पवार गटाला नोटीस, उत्तरासाठी तीन आठवड्यांची मुदत
- मीडिया पर्सेप्शन पलीकडले भाजपचे ग्राउंड वर्क सुरू; महाराष्ट्राचे 40 आमदार ट्रेनिंगसाठी जाणार मध्य प्रदेशात!!