वृत्तसंस्था
मुंबई : Prithviraj Chavan आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवर आता काँग्रेस पक्षाचा वतीने वॉच ठेवण्यात आले आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर केलेल्या आरोप संदर्भातले पुरावे शोधले जाणार आहेत.Prithviraj Chavan
या संदर्भातली माहिती देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये केलेल्या आचारसंहिता भंगाची देखील माहिती देण्यात आली. यासंदर्भात देखील काँग्रेस लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.Prithviraj Chavan
नरेंद्र मोदींचे पंतप्रधानपद, लोकसभा सदस्यत्व रद्द करा – उच्च न्यायालयात याचिका
नरेंद्र मोदींचे पंतप्रधानपद आणि लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मोदींनी 2020 मध्ये आचारसंहितेचा भंग केला असल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने देखील अंशतः सदरील प्रकरण मान्य केले असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता गांभीर्याने पाहिले जात आहे.Prithviraj Chavan
राहुल गांधींच्या आरोपाचे विश्लेषन करणार
राहुल गांधी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर आक्षेप घेत आहेत. निवडणुकीच्या आधी अचानक मतदार संख्येमध्ये चार महिन्यात 41 लाख संख्या वाढली आहे. या आरोपाला पुढे नेण्याकरता मी माझ्या मतदारसंघांमधील तसेच काँग्रेसच्या इतर काही सहकार्यांनी त्यांच्या मतदार संघामध्ये पाहणी केलेली आहे. त्याचा अहवाल मी दिल्लीतील बैठकीत सादर केला होता. त्या माहितीच्या आधारावर प्रांत अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रभारी यांनी एक कमिटी स्थापन केली आहे. या संदर्भात राहुल गांधींनी जो लेख लिहिला होता, त्याविषयी विश्लेषण करण्याकरता त्याविषयी काय भूमिका आहे? हे स्पष्ट करण्याकरता, ती समिती गठित करण्यात आली आहे. त्यावर जून विश्लेषण सुरू असून त्याचा अहवाल लवकरच सादर करणार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला खरेच निवडणुका पारदर्शकपणे घ्यावयाच्या असेल, तर यामध्ये बरेच बदल करावे लागणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
चारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने मान्य केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली पण मोदींवर कारवाई केलेली नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली होती. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही मग नरेंद्र मोदींवर आयोग कारवाई का करत नाही? असा प्रश्न विचारूरन याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.
कायदा धाब्यावर बसवण्यात आला
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, दि. २८ डिसेंबर २०२० रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वे मंत्री, कृषी मंत्री यांनी सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या किसान रेल्वेच्या १०० व्या गाडीचा शुभारंभ केला. यावेळी महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका व पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु होत्या. हा कार्यक्रम देशभर टीव्हीवर प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. याविषयी प्रफुल्ल कदम या कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असता सुरुवातीला वेळकाढूपणा करण्यात आला पण शेवटी आचारसंहिता भंग झाल्याचे मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज देण्यात आली. या प्रकरणी सरळ सरळ कायदा धाब्यावर बसवण्यात आलेला आहे हे स्पष्ट दिसत असतानाही नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई केली जात नाही, असे चव्हाण म्हणाले.
प्रफुल्ल कदम यांनी केली होती तक्रार
या प्रकरणी तक्रार करणारे प्रफुल्ल कदम यांनी आचारसंहिता भंग कशी झाली याची माहिती सर्व नियम व कायद्यानुसार दिली. निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव पाडण्याचा हा प्रयत्न असून आदर्श आचारसंहितेचा उघड भंग केलेला असल्याने नरेंद्र मोदी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Congress to ‘Watch’ Election Commission Voter List in Maharashtra; Prithviraj Chavan to Head Committee
महत्वाच्या बातम्या
- पीएम मोदींचे संसदेतील संपूर्ण भाषण; काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले- इतकी चर्चा करा की शत्रू घाबरेल!
- जगातल्या कुठल्याही नेत्याने Operation Sindoor थांबवायला सांगितले नाही; डोनाल्ड ट्रम्पच्या 25 दाव्यांना मोदींचा एकच फटका
- Bihar SIR : बिहारमध्ये SIR वर तूर्त बंदी नाही; SCने ECला विचारले- आधार कार्ड व मतदार ओळखपत्र का समाविष्ट करत नाही?
- Shashi Tharoor : ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, थरूर म्हणाले – मौन व्रत; संसदेत काँग्रेसच्या विचारसरणीवर बोलण्यास नकार दिल्याची चर्चा