• Download App
    काँग्रेसच्या स्थापना दिनी 2024 चे बिगुल; भाजप सरकारवर हल्ल्यासाठी काँग्रेसने निवडला संघाचा बालेकिल्ला नागपूर!! Congress "selects" nagpur, sangh bastion for its rally on foundation day of the party

    काँग्रेसच्या स्थापना दिनी 2024 चे बिगुल; भाजप सरकारवर हल्ल्यासाठी काँग्रेसने निवडला संघाचा बालेकिल्ला नागपूर!!

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : लोकसभा निवडणूक 2024 ची सेमी फायनल काँग्रेसने हरली असली, तरी फायनल जिंकण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. केंद्रातल्या भाजप सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी काँग्रेसने संघाचा बालेकिल्ला नागपूर शहराची निवड केली आहे. काँग्रेसच्या स्थापना दिनी म्हणजे 28 डिसेंबर 2023 रोजी काँग्रेसची नागपुरात महारॅली होणार आहे. त्याच दिवशी काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल फुंकणार आहे. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. Congress “selects” nagpur, sangh bastion for its rally on foundation day of the party

    28 डिसेंबरला नागपुरात होणाऱ्या महारॅलीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हजर राहणार आहेत. या महारॅलीत तब्बल 10 लाख लोक उपस्थित राहण्याचे नियोजन पक्षाचे नेते करत आहेत.

    काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या सेमी फायनल मध्ये म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये जबरदस्त मार खाल्ला. छत्तीसगड आणि राजस्थान मधले सरकार गमावले. मध्य प्रदेशातही भाजप सरकार खाली खेचण्यात काँग्रेस यशस्वी ठरली नाही. मात्र, तेलंगणात भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाचा पराभव करून काँग्रेस सत्तेवर आली. काँग्रेस साठी सेमी फायनलची निवडणूक राजकीय खच्चीकरण करणारी ठरली, पण आता त्यातून देखील पक्षाने उभारी घेतल्याचे दाखवण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर शहराची निवड केली आहे.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यातून लोकसभा निवडणूक 2024 चे रणशिंग फुंकून फक्त काँग्रेसच संघ आणि भाजपला खऱ्या अर्थाने राष्ट्र पातळीवर आव्हान देऊ शकते, असे काँग्रेसला दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी 10 लाख लोकांच्या महारॅलीचे पक्षाचे नेते नियोजन करत आहेत. या महारॅलीसाठी मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि तेलंगण या राज्यांमधून नागपुरात लोक आणण्याची देखील पक्षाने तयारी चालवली आहे.

    Congress “selects” nagpur, sangh bastion for its rally on foundation day of the party

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस