• Download App
    मुलीसाठी तिकिटाचे विजय वडेट्टीवारांचे प्रयत्न फोल; चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसचे तिकीट; वडेट्टीवार बंडाच्या पवित्र्यात!! Congress rejects ticket to shivani vadettiwar, vijay vadettiwar in rebellion mood!!

    मुलीसाठी तिकिटाचे विजय वडेट्टीवारांचे प्रयत्न फोल; चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसचे तिकीट; वडेट्टीवार बंडाच्या पवित्र्यात!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार हिला तिकीट मिळावे यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले प्रयत्न फोल ठरले. शिवानी वडेट्टीवार यांना टाळून काँग्रेस हायकमांडने आमदार प्रतिभा सुरेश धानोरकर यांना चंद्रपूरातून तिकीट दिले. त्यामुळे विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार हे दोघेही काँग्रेस मधून बंड करून भाजप किंवा शिवसेनेत दाखल होतात का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Congress rejects ticket to shivani vadettiwar, vijay vadettiwar in rebellion mood!!

    चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात स्वतः विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यानेच लोकसभा निवडणूक लढवावी, यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आग्रही होते. तेथे ते भाजपचे उमेदवार राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चांगली टक्कर देऊ शकतील, असे काँग्रेसच्या वरिष्ठांचे मत होते. पण विजय वडेट्टीवार हे स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरायला तयार नव्हते. त्यांनी त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार तिचे नाव पुढे करून तिच्यासाठी तिकीट मागितले होते. परंतु, काँग्रेस हा एक कमांड नाही शिवानी वडेट्टीवार हिचे तिकीट नाकारून चंद्रपुरातले एकमेव काँग्रेस खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांची पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याच बाजूने कौल दिला. प्रतिभा धानोरकर नुकत्याच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन चंद्रपुरात आल्या होत्या.

    प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसने तिकीट दिल्याने विजय आणि शिवानी वडेट्टीवार हे पिता-पुत्री नेमकी कोणती राजकीय भूमिका घेतात?? ते काँग्रेस मधून बंड करून बाहेर पडून भाजप किंवा शिवसेनेत दाखल होतील का??, असा कळीचा सवाल समोर आला आहे. कारण त्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात फार पूर्वीपासूनच सुरू आहेत.

    महाराष्ट्र विधानसभेतला विरोधी पक्ष नेता हा सत्ताधारी पक्षात जातो, हा इतिहास नारायण राणे यांच्यापासून अजित पवार यांच्यापर्यंत कायम आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार हे आपले विरोधी पक्षनेते पद सोडून भाजपचे कमळ किंवा शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतात का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!

    Congress rejects ticket to shivani vadettiwar, vijay vadettiwar in rebellion mood!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस