• Download App
    Congress Stays in Baramati Bypoll: Harshwardhan Sapkal Refutes Withdrawal Rumors आम्ही बारामती निवडणुकीतून माघार घेतली नाही, काँग्रेसची स्पष्टोक्ती

    Harshwardhan Sapkal : आम्ही बारामती निवडणुकीतून माघार घेतली नाही, काँग्रेसची स्पष्टोक्ती

    Harshwardhan Sapkal

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Harshwardhan Sapkal काँग्रेसने बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली नाही. भाजप या प्रकरणी मुद्दा अफवा पसवून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे.Harshwardhan Sapkal

    बारामती विधानसभा मतदासंघात येत्या 23 तारखेला पोटनिवडणूक होत आहे. ही जागा अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार येथून सत्ताधारी महायुतीतर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यांना विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही पाठिंबा दिला आहे. पण काँग्रेसने ही लढवण्याची घोषणा करत येथून आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. पण आज अचानक काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची चर्चा सुरू झाली असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी तातडीने उपरोक्त स्पष्टीकरण दिली आहे.Harshwardhan Sapkal



    काँग्रेसशी भाजपच्या कोणत्याही नेत्याने संपर्क साधला नाही

    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने काँग्रेस पक्षाशी अद्याप संपर्क साधलेला नाही. या संदर्भात प्रसारित होत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार आहेत. अशा अफवा मुद्दाम पसरवून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी स्थिती स्पष्ट करताना सांगितले आहे.

    ‘झाडखाऊ’ म्हणत फडणवीसांवर निशाणा

    हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिक येथील वृक्षतोडीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी फडणवीसांचा उल्लेख ‘झाडखाऊ’ असा केला आहे. ‘झाडखाऊ’ची कुऱ्हाड आरे नंतर आता नाशिक वर, उद्या असेल संपूर्ण महाराष्ट्रावर, असे ते म्हणालेत. या प्रकरणी त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात कुऱ्हाड असून, त्यांच्यापुढे तोडलेल्या झाडांचे बुंधे दिसत आहेत. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

    विजय वडेट्टीवारांचाही महायुतीवर निशाणा

    दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही नाशिक येथील कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचारावरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांना मलिदा गँगची उपमा दिली आहे. “हिंदू खतरे मे है…, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे” असे हिंसक नारे भाजपला का द्यावे लागतात हे आता सर्वांना समजलंच असेल. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झाले आहेत. जनतेला याची खबर होऊ नये म्हणून त्यांच्यात धार्मिक वाद पेटण्याचे कसब भाजपने वापरले.

    धर्माच्या नावावर सत्तेत आलेले स्वतः मात्र कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यातही कोट्यावधींचा भ्रष्टाचार करत आहेत. हा पैसा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आहे. आपल्या भ्रष्टाचाराने, अमानुष वृक्षतोडीने कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्याला बदनाम करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल, असे वडेट्टीवार म्हणालेत.

    Congress Stays in Baramati Bypoll: Harshwardhan Sapkal Refutes Withdrawal Rumors

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बारामती बिनविरोध करण्यासाठी अख्खा पवार कुटुंबाची धडपड; भविष्यातल्या बेगमीसाठी काँग्रेस पुढे शरणागती!!

    Nashik Godman Case : भोंदूबाबा अशोक खरातला कोर्टाचा दणका; न्यायालयीन कोठडी; आज पुन्हा हजेरीचे आदेश; SIT ताबा घेणार

    Sharmila Thackeray : व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते?:राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंचा सवाल; महिलांना भोंदूबाबांकडे न जाण्याचे केले आवाहन