नाशिक : बंडखोर आमदारांवर कारवाईच्या नुसत्याच बाता; आमदार महायुतीच्या वाटेवर निघताच काँग्रेसचा हात आखडता!!, असेच आता घडताना दिसत आहे. विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांनी पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील पडले. उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना उभे केले त्यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीत दमबाजी केली. त्यांनी शरद पवारांचा फोन देखील घेतला नाही, पण त्याच वेळी जयंत पाटलांना यांना काँग्रेसच्या 7 बंडखोर आमदारांनी मते दिली नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीला विधान परिषद निवडणूक मित्र पक्षाचा आमदार निवडून आणता आला नाही, अशी नाचक्की झाली. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश नेतृत्व चिडले आणि त्यांनी बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचा धाक घातला. पण प्रत्यक्षात अजूनही कारवाई झालेली नाही. किंवा एकही आमदार काँग्रेसने निलंबित केलेला नाही. Congress not to axe it’s own MLA’s for not voting jayant patil
पण आहे का आणि कसे घडले??, तर याविषयी “द फोकस इंडिया”ने आधीच भाकीत केले होते. त्यानुसार शरद पवारांनी उभा केलेला शेतकरी कामगार पक्षाचा आमदार पडल्यानंतर काँग्रेस आपल्या आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता नव्हतीच. कारण दुसऱ्याने उभा केलेला उमेदवार तिसऱ्याने पाडल्यानंतर आपल्याच पक्षातल्या आमदारांना निलंबित करणे काँग्रेसला परवडणारे नव्हते. पण महाविकास आघाडीत आपली बूज राखली जावी म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते बंडखोर आमदारांवर कारवाईच्या बाता मारत होते. अगदी काँग्रेसचे संघटन सचिव म्हणजे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या जवळचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी देखील त्यावर भाष्य केले होते. त्यामुळे बंडखोर आमदारांवर काँग्रेस निलंबनाची कारवाई करणार असे चित्र मराठी माध्यमांमध्ये निर्माण झाले होते. “द फोकस इंडिया”ने त्यावेळेसच त्या बातमीला छेद दिला होता.
पण प्रत्यक्षात आता ही कारवाईच बारगळली आहे. कारण बंडखोर आमदार महायुतीच्या जवळ जाऊ लागले आहेत. आमदार हिरामण खोसकर यांनी परवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आज आमदार जितेश अंतापूरकर भाजपचे राज्य सभा खासदार अशोक चव्हाण यांच्या भेटीला पोहोचले. त्यामुळे असेच एकेक आमदार गळत राहून ते जर महायुतीच्या वळचणीला जाणार असतील तर त्यांच्यावर कारवाई करून काय फायदा??, असा पोक्त राजकीय विचार काँग्रेस नेतृत्वाने केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या तरी थेट निलंबनाची कारवाई टाळून प्रत्यक्ष विधानसभेच्या निवडणुकीची तिकिटे पकापावीत असा विचार काँग्रेस नेते करत असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.
प्रत्यक्षात “द फोकस इंडिया”ने भाकित केल्याप्रमाणे, मूळात शरद पवारांनी उभा केलेला उमेदवार उद्धव ठाकरे यांच्यामुळे पडला म्हणून काँग्रेसने आपल्या पक्षाच्या आमदारांवर कारवाई करायची हे “राजकीय लॉजिक” मध्येच बसणारे नव्हतेच, त्यामुळे केवळ महाविकास आघाडीत आपली बूज राखण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने बंडखोर आमदारांवर कारवाईची हूल दिली. पण प्रत्यक्षात जेव्हा बंडखोर आमदार स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार करून महायुतीच्या वाटेवर जायला निघाले, त्यावेळी मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने कारवाईचा हात आखडता घेतल्याचे चित्र दिसत आहे.