• Download App
    RSS संघ प्रवक्त्यांच्या एका वाक्यावर काँग्रेस + राष्ट्रवादीवाले हुरळले; संघाचे अभिनंदन करून औरंगजेबाचे महिमा मंडन चालू ठेवले!!

    संघ प्रवक्त्यांच्या एका वाक्यावर काँग्रेस + राष्ट्रवादीवाले हुरळले; संघाचे अभिनंदन करून औरंगजेबाचे महिमा मंडन चालू ठेवले!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संघ प्रवक्त्यांच्या एका वाक्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले हुरळले; संघाचे अभिनंदन करून औरंगजेबाचे महिमा मंडन चालू ठेवले.

    – त्याचे झाले असे :

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक प्रतिनिधी सभेची बैठक बंगलोरमध्ये भरली. त्याची माहिती देण्यासाठी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद प्रामुख्याने प्रतिनिधी सभेच्या बैठकीच्या अजेंड्याविषयी माहिती देण्यासाठी होती.

    सुनील आंबेकर यांनी प्रास्ताविकात त्या संदर्भात सगळी माहिती दिली आणि त्यानंतर प्रश्नोत्तरे घेतली. पत्रकार परिषद संपताना एका महिला पत्रकाराने त्यांना, “इज औरंगजेब रेलेव्हंट टुडे??”, असा प्रश्न विचारला. त्यावर सुनील आंबेकर यांनी, “नो, औरंगजेब इज नॉट रेलेव्हंट टुडे”, असे एकाच वाक्यात उत्तर दिले. त्यावेळी महिला पत्रकाराने औरंगजेबाच्या कबरी विषयी किंवा ती उखडून टाकण्याविषयी कुठल्याही नेमका प्रश्न विचारला नव्हता. त्यामुळे सुनील आंबेकर यांनी त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.

    पण तरी देखील सुनील आंबेकर यांच्या एकाच वाक्यावर काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीवाले हुरळले. त्यांनी संघाचे अभिनंदन केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संघाच्या भूमिकेचे स्वागत केले. औरंगजेब आज रेलेव्हंट नाही हे जर संघ म्हणत असेल तर त्यांच्याच परिवारातल्या इतर संघटनांनी त्यातून धडा घेतला पाहिजे, असे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी अप्रत्यक्षपणे औरंगजेबाच्या कबरीचे समर्थन करून टाकले.

    Congress NCP SP half hurtedly praise RSS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांची फडणवीस स्तुती, हे विरोध मावळल्याचे लक्षण की त्यांनी फडणवीसांच्या खांद्यावर हात ठेवल्याचे लक्षण??

    Solapur : सोलापुरात धर्मांतरासाठी महिलांना पैशांचे आमिष; फादरवर गुन्हा दाखल

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- माणिकराव कोकाटेंचे बोलणे चुकलेच, त्यांनी काहीही सांगितले तरी आमच्यासाठी भूषणावह नाही!