• Download App
    praniti shinde गृहमंत्री वडिलांनी ठरविले होते हिंदूंना दहशतवादी

    Praniti Shinde : गृहमंत्री वडिलांनी ठरविले होते हिंदूंना दहशतवादी; खासदार मुलगी लोकांना उकसवतीये हातात घ्यायला लाठी काठी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गृहमंत्री वडिलांनी ठरविले होते हिंदूंना दहशतवादी आता त्यांची खासदार मुलगी लोकांना उकसवतीये हातात घ्यायला लाठी काठी!!, असला प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. Congress MP praniti shinde instigated violence and civil war

    काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे केंद्रात गृहमंत्री असताना मुंबईवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता हे दहशतवादी पाकिस्तानी होते परंतु त्यांनी आणि काँग्रेस पक्षाने मुंबईवरच्या हल्ला प्रकरणात त्याचबरोबर मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला होता हिंदू दहशतवाद ही संकल्पना संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर लादण्याचा प्रयत्न केला होता. पण दोन वर्षात तो प्रयत्न उधळला गेला.

    आता सुशील कुमार शिंदे यांचीच मुलगी खासदार प्रणिती शिंदे हिने देशात लोकांना हातात लाठीकाठी घेऊन हिंसाचाराला चिथावणी दिली आहे. देशात सरकार आमच्या ऐकत नाही पोलीस आमच्याकडे लक्ष देत नाहीत प्रशासन आमच्या समस्या सोडवत नाही त्यामुळे लोकांना रस्त्यावर उतरून हिंसाचार करणे हेच पर्याय नाही असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला हातात लाठीकाठी घेऊन स्वतःच्या समस्या सोडवण्याशिवाय लोक दुसरे काय करू शकतात??, असा सवाल करून त्यांनी हिंसाचाराचे समर्थन केले.

    एबीपी न्यूजची अँकर रुमाना इसार खान हिच्याशी प्रणिती शिंदे यांचा टीव्ही डिबेट मध्येच वाद रंगला. देशात महात्मा गांधींच्या अहिंसेने आंदोलन करून प्रश्न सुटतात. परंतु, तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी हिंसाचाराला प्रोत्साहन देतात, याकडे रुमाना इसारखान हिने प्रणिती शिंदे यांचे लक्ष वेधले. त्यावेळी लोकांना दुसरा पर्याय नाही. ही लोकशाही आहे. लोकचं ठरवतात. रस्त्यावर उतरायचे. हातात दगड घ्यायचे. लाठ्या काठ्या घ्यायच्या आणि हिंसाचार करायचा. आता देशात सिव्हिल वॉर होईल, असे तारे प्रणिती शिंदे यांनी तोडले.

    Congress MP praniti shinde instigated violence and civil war

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप

    jayant patil : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार; शरद पवारांशी चर्चा करून 2 दिवसांत राजीनाम्याची शक्यता

    महापालिका + झेडपी निवडणुकांचा महायुतीचा खरा फॉर्म्युला; ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!