गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाला होता. यानंतर सहा महिन्यांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.Congress MLA’s son arrested in rape case; Had been absconding for 6 months
विशेष प्रतिनिधी
इंदूर : यूथ काँग्रेस संघटनेशी संबंधित असणाऱ्या एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित तरुणीनं लग्नासाठी विचारलं असता, आरोपीने पीडितेशी लग्नाला नकार देत तिची फसवणूक केली होती. आरोपी हा बडनगरचे काँग्रेस आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा करण मोरवाल आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीने करण मोरवाल विरोधात गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलगी इंदूरची रहिवासी आहे.गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाला होता. यानंतर सहा महिन्यांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
आरोपी करण मोरवालवर पोलिसांनी बलात्कारासह अन्य गंभीर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे तो गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. या घटनेमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण बरंच तापलं होतं. तसेच राजकीय दबावामुळे पोलीस कायदेशीर कारवाई करत नसल्याचा आरोप पोलिसांवर झाला होता.
पण अखेर सहा महिन्यांनंतर आरोपी करण मोरवाल याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपी करणला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षिसाची घोषणा देखील केली होती. पोलिसांनी सुरुवातीला १० हजार, नंतर १५ हजार आणि अलीकडेच २५ हजार रुपयांची घोषणा केली होती.
आरोपी नेपाळला पळून गेल्याची भीती देखील व्यक्त केली जात होती. अखेर सहा महिन्यानंतर महिला पोलिसांनी आरोपीला मक्सी येथून अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपीला अटक न झाल्यामुळे पीडित तरुणीने राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची तीन वेळा भेट घेतली होती. नरोत्तम मिश्रा यांनी आरोपीला लवकरच अटक करू, असं आश्वासन पीडितेला दिलं होतं. तसेच आरोपीकडून दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता.
Congress MLA’s son arrested in rape case; Had been absconding for 6 months
महत्त्वाच्या बातम्या
- हडपसरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी; नगरी वस्तीतीतील घटनेमुळे पसरली दहशत
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच्या संकुलात आढळला 8 फूट लांबीचा अजगर, तीन पथकांनी सुटका करून सोडले जंगलात
- समीर वानखेडे यांनी दलिताचा हक्क हिसकावला, जात प्रमाणपत्र दाखवा, नवाब मलिकांचे आव्हान
- पट्टणकोडोलीमध्ये विठ्ठल-बिरदेव यात्रा पाऊसमान चांगले, कडधान्य महाग – भाकणूक