प्रतिनिधी
अमरावती : संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकच्या रस्त्यावर दगडफेक आणि चप्पल फेक केली असताना शरद पवारांचा अमरावती दौरा त्यांच्या भाषणापेक्षा त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या बातम्यांनीच गाजला. पण त्याहीपेक्षा पलिकडे जाऊन काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी एक खळबळजनक विधान करून पवारांचा दौरा गाजवला.Congress Minister Yashomati Thakur’s Shiv Sena – Political minefield under Congress
शरद पवारांचे नेतृत्व ही काळाची गरज आहे. ते मुख्यमंत्री असते तर आज महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी असती, असे वक्तव्य करून यशोमती ठाकूर यांनी एकाच वेळी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या खाली राजकीय सुरुंग लावला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षा बोलून दाखवली आहे. 2024 नंतर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असे ते म्हणाले आहेत त्याचबरोबर सध्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आहेत. त्यामुळे शिवसेनेचाही मुख्यमंत्रीपदावर दावा मजबूत आहे.
अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राहून यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा संदर्भात वक्तव्य करून आपलाच काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष शिवसेना यांच्या खाली राजकीय सुरुंग लावून ठेवला आहे. राजकीय वर्तुळात त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Congress Minister Yashomati Thakur’s Shiv Sena – Political minefield under Congress
महत्त्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या सहलीसाठी तीन व्यापाऱ्यांनी मोजले चक्क ४.१७ अब्ज रुपये
- राम नवमी – चैत्री नवरात्री निमित्त योगी आदित्यनाथांचे गोरखपुर मध्ये कन्या पूजन!!
- बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याची महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलची खंत; भाजपा करणार 5 लाख रुपये देऊन सत्कार!!
- ‘जय श्रीराम’ लिहिल्याने भोपाळमध्ये मुस्लीम व्यक्तीला मुस्लिम धर्मांधांकडून मारहाण : भाजप आमदाराच्या फेसबुक पोस्टवर व्यक्त केली होती प्रतिक्रिया