• Download App
    Maratha agitation मराठा आरक्षणाच्या अख्ख्या राजकारणात काँग्रेसच्या नेत्यांना घातले खोपच्यात!!

    मराठा आरक्षणाच्या अख्ख्या राजकारणात काँग्रेसच्या नेत्यांना घातले खोपच्यात!!

    नाशिक : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या मराठा आरक्षणाच्या अख्ख्या राजकारणात काँग्रेसच्या नेत्यांना घातले खोपच्यात!!, असं म्हणायची वेळ काँग्रेसच्या आजच्या राजकीय दूरवस्थेने आणली. काँग्रेसचे आत्तापर्यंत निवडणुकांमध्ये अनेकदा पराभव झाले पण काँग्रेसची एवढी दारूण अवस्था कधीही झाली नव्हती, तेवढी मराठा आरक्षणाच्या राजकारणाने केली.

    – फडणवीस विरुद्ध पवार

    मराठा आरक्षणाच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार या सगळ्या सामन्यामध्ये उद्धव ठाकरे थोडेफार अवतीभवती तरी दिसले. मध्येच राज ठाकरे चमकून गेले. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून त्यांना केंद्रस्थानी कायम ठेवले. शरद पवारांच्या शिवाय मराठाच काय, पण कुठलेच राजकारण हालत नाही, बोलत नाही आणि चालतही नाही, असे म्हणत पवार बुद्धीच्या मराठी माध्यमांनी शरद पवारांना चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवले त्यातून आझाद मैदानाच्या स्टेजवर सुप्रिया सुळे येऊन लुडबूड करून गेल्या. रोहित पवारांनी संभाजी ब्रिगेडच्या लोकांना कॉल करून मनोज जरांगेंच्या आंदोलनात घुसखोरी करायला लावली. सोशल मीडिया वरून स्वतःचा राजकीय धुमाकूळ सुरू ठेवला. पण या सगळ्यांमध्ये एकेकाळी अख्ख्या महाराष्ट्राचे राजकारण एक हाती हालवलेल्या काँग्रेसचे नेते गायबच दिसले. ते कुठेही ना स्टेजवर दिसले, ना हेडलाईन्स मध्ये दिसले. राहुल गांधींनी चालवलेल्या मतदान चोरीच्या राजकारणात महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते देखील हरवून गेले. मतदान चोरीचे राजकारण राहुल गांधींनी बिहारमध्ये रंगविले त्याचा मागमूस देखील महाराष्ट्रात दिसला नाही. मराठा आरक्षणाच्या राजकारणात काँग्रेस नेत्यांना कुठे चंचू प्रवेश देखील करता आला नाही. एवढे ते राजकारण देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांनी “टाईट” करून ठेवले होते.



    – पवार बुद्धीचे नेते नाराज

    शेवटी कोर्टाच्या दबावामुळे फडणवीस सरकार आणि मनोज जरांगे यांच्या पॉलिटिकल पॅचअप करावे लागले. सरकारला जीआर काढावा लागला आणि तो जीआर मनोज जरांगे यांना मान्य करावा लागला. त्यांचे उपोषण सुटले. कोर्टाच्या कारवाईच्या भीतीने आझाद मैदान चार दिवसांत खाली करावे लागले. सगळ्यांना घरी जावे लागले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून देवेंद्र फडणवीस यांचा केसही वाकडा करू शकलो नाही म्हणून पवार बुद्धीच्या नेत्यांनी आणि विद्वानांनी आदळ आपट केली. मनोज जरांगे यांच्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. यात बी. जी. कोळसे पाटील आणि असीम सरोदे समोर आले. विनोद पाटलांनी मनोज जरांगेंना बोल लावले. छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला. फडणवीस सरकारने ओबीसींसाठी देखील जीआर काढला.

    – प्यादी हलवण्यात काँग्रेस नेते कुठेच नाहीत

    पण हे सगळे राजकारण देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार आणि अधून मधून उद्धव ठाकरे यांच्यातच खेळले गेले. मनोज जरांगे आणि बाकीची प्यादी इकडे तिकडे हलवली गेली. फडणवीस हा डाव जिंकले. पण या सगळ्यांमध्ये काँग्रेसचे नेते कुठेही दिसले नाहीत. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याविषयी शासनाचे जीआर बाहेर आले त्यानंतर आज हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन फडणवीस सरकारचा निषेध केला. फडणवीस सरकारला हाच जीआर काढायचा होता, तर तो आली का नाही काढला??, मराठा आणि ओबीसी समाजांना त्यांनी झुंजवत का ठेवले??, असे सवाल करून सपकाळ आणि वडेट्टीवार यांनी आम्हीही महाराष्ट्रातले नेते आहोत, असे दाखवून द्यायचा प्रयत्न केला.

    पण अख्ख्या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते किरकोळ स्थानिक पातळीवर वगळता राज्यभरातल्या माध्यमांमध्ये झळकू शकले नाहीत. त्यांनी व्यक्त केलेल्या मतांची चर्चा देखील महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घडवू शकले नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसची नेमकी भूमिका काय हे कोणाला समजू शकले नाही आणि त्यामुळे कोणाला फरकही काही पडला नाही. महाराष्ट्र काँग्रेसची ही दारुण अवस्था बरेच काही राजकीय सत्य सांगून गेली. महाराष्ट्रात आता काँग्रेसची चलती राहणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस खऱ्या अर्थाने चौथ्या स्थानावर फेकली गेली हे बोचणारे सत्य या निमित्ताने उघड झाले.

    Congress leaders were no where in Maratha agitation politics

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मोदींच्या रिटायरमेंट वरून अनेक खुलासे + प्रतिखुलासे, तो विषयही गुंडाळला बासनात; पण आता त्यावरून हर्षवर्धन सपकाळांचे स्वप्नरंजन!!

    Rahul Deshpande : लोकप्रिय शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा घटस्फोट; 17 वर्षांच्या संसारानंतर पत्नी नेहापासून वेगळे

    Suhana Khan : शाहरुखच्या मुलीने शेतकऱ्यांना दिलेली सरकारी जमीन खरेदी केली; सुहानावर परवानगीशिवाय जमीन खरेदीचा आरोप