विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत मोठी भेग पडली असून सांगली आणि भिवंडीत ठाकरे + पवारांच्या पक्षाविरुद्ध काँग्रेस नेत्यांचा प्रचंड उद्रेक झाला आहे. महाराष्ट्रातली महाविकास आघाडी टिकवायचे असेल तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांनी काँग्रेसवरची कुरघोडी बंद करावी. सांगली आणि भिवंडी या लोकसभेच्या हक्काच्या जागा काँग्रेसलाच सोडून द्याव्यात अन्यथा सगळीकडे बंडखोरी करून त्या पक्षांची पुरती वासलात लावू, असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला आहे.Congress leaders angry over seats or sangli and bhivandi
सांगली आणि भिवंडी हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ मूळचे काँग्रेसचेच आहेत त्यामुळे काँग्रेसचे नेते ठाकरे आणि पवारांच्या पक्षांकडून काही वेगळे मागत नाहीत मूळच्या हक्काच्या जागाच मागत आहेत. त्या दोन्ही पक्षांनी सोडून द्याव्यात, असा इशाराही काँग्रेस नेत्यांनी दिला आहे.
सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली तिथे संजय राऊत यांनी तळ ठोकला ते वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन चंद्रहार पाटलांसाठी प्रचार सभा घेत आहेत. मात्र, काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली आणि थेट दिल्ली गाठली. विशाल पाटलांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिले. त्यात सांगलीची जागा काँग्रेसच्या हाताच्या पंजा या चिन्हावरच लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामध्ये काँग्रेस नेत्यांची मोठी जंत्री त्यांनी नमूद केली यामध्ये वसंतदादा पाटलांपासून शिवाजीराव देशमुखांपर्यंतची सगळी नावे त्यांनी लिहिली, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वडील ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील यांचे नाव मात्र वगळले. कारण राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. ते आता चौथ्या पिढीत देखील सुरू असल्याचे विशाल पाटलांनी दाखवून दिले.
याच दरम्यान संजय राऊत आणि विश्वजीत कदम यांच्यात वाक्य धरंगले वाघ युद्ध रंगले विश्वजीत कदम यांचे विमान दिल्लीहून थेट गुजरातकडे जायला नको असे संजय राऊत म्हणाले त्यावर विश्वजीत कदम यांनी देखील तितकेच तिखट प्रत्युत्तर दिले.
दुसरीकडे भिवंडीतून शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसने बाळ्यामामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली. त्याबरोबरच त्यांच्या गोडाऊन वर इन्कम टॅक्सचे छापे पडले. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली. भिवंडीच्या काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांना इशारा दिला. काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर परस्पर राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करायला नको होता. त्यांनी उमेदवार जाहीर केला तरी काँग्रेसचे नेते त्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत प्रसंगी बंडखोरी करून शरद पवारांच्या उमेदवाराला पाडू, असा इशारा काँग्रेसच्या मेळाव्यात देण्यात आला.
Congress leaders angry over seats or sangli and bhivandi
महत्वाच्या बातम्या
- आम्ही घोषणापत्र आणत नाही, आम्ही संकल्पपत्र आणतो’ पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर ओढले ताशेरे
- अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी अडखळली; उत्तर प्रदेशात एक दोन नव्हे, तब्बल 9 उमेदवार बदलण्याची वेळ!!
- कर्नाटकच्या अपक्ष खासदार सुमलता अंबरीश यांचा भाजपमध्ये प्रवेश
- मुख्तार अन्सारीवर विषप्रयोगाचे आरोप बिनबुडाचे, चौकशी सुरू अहवाल येईल- राजनाथ सिंह