अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस ठाण्यात अभिनेत्री कंगना रनौत विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्य अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे सचिव हाजी सय्यद कमरुद्दीन यांनी ही तक्रार केली आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या वक्तव्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान झाल्याचे सय्यद कमरुद्दीन यांनी म्हटले आहे. त्यामुळे कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. congress leader haji sayyed kamruddin lodges complaint against actress kangana ranaut in akola over her remark on independence
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस ठाण्यात अभिनेत्री कंगना रनौत विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्य अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे सचिव हाजी सय्यद कमरुद्दीन यांनी ही तक्रार केली आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या वक्तव्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान झाल्याचे सय्यद कमरुद्दीन यांनी म्हटले आहे. त्यामुळे कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हाजी सय्यद कमरुद्दीन यांनी शुक्रवारी (19 सप्टेंबर) कंगना रनौतविरोधात पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांना कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे.
कंगना रनौतचे भारताच्या स्वातंत्र्यावर वादग्रस्त विधान
बॉलीवूड क्वीन कंगना रनौत सध्या महात्मा गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिच्यावर अनेक कॉमेंट्स केल्या जात आहेत. कंगनाने मंगळवारी (१६ नोव्हेंबर) तिच्या वक्तव्यात म्हटले की, महात्मा गांधींनी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना मदत केली नाही. याशिवाय कंगना म्हणाली की, जर कोणी एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य मिळत नाही. 1947 मध्ये भीक मागण्यात स्वातंत्र्य मिळाले. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये (मोदी सरकार आल्यानंतर) मिळाले. कंगनाच्या इंस्टाग्रामवर केलेल्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
कंगना रनौतने स्पष्टीकरणात काय म्हटले?
कंगनाच्या या मतांवर जेव्हा अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि तिला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले तेव्हा ती म्हणाली, ‘मी स्पष्टपणे सांगितले आहे की 1857 ची क्रांती ही पहिली स्वातंत्र्य लढा होती, जी दडपण्यात आली होती. यानंतर ब्रिटीशांचे अत्याचार आणि त्यांचे क्रौर्य वाढले. यानंतर सुमारे शंभर वर्षांनंतर आपल्याला भिकेच्या रूपाने स्वातंत्र्य मिळाले. एका न्यूजपेपर आर्टिकलचे जुने कटिंग शेअर करत कंगना रनौतने लिहिले की, ‘1947 मध्ये काय घडले हे कोणी मला सांगितले तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करीन. 1857 मध्ये कोणती लढाई लढली गेली हे आपल्याला माहिती आहे. पण 1947 मध्ये कोणती लढाई लढली होती हे माहीत नाही.”
congress leader haji sayyed kamruddin lodges complaint against actress kangana ranaut in akola over her remark on independence
महत्त्वाच्या बातम्या
- युरोपमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा तडाखा, ऑस्ट्रियात लॉकडाऊन; जर्मनीमध्ये संकट
- पुण्याच्या प्रसिद्ध हॉटेलमधील वेटरची इमारतीवरून उडी मारून लाईव्ह आत्महत्या; घटनेमुळे उडाली खळबळ
- इंदुरीकर महाराजांनी जालना जिल्ह्यातून कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास केली सुरुवात ; म्हणाले…..
- रक्तातच देशसेवा, पती दहशतवादी हल्यात शहीद झाल्यावर पत्नी झाली लष्करी अधिकारी, दोन मुलांची आई
- हिंदू धर्माची शिकवण देण्यासाठी धर्म बदलविण्याची गरज नाही; पण आपल्या लोकांचाही धर्म बदलवू देऊ नका, सरसंघचालकांचे आवाहन