प्रतिनिधी
नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी विजयश्री खेचून आणत तांबे कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. विजयी झाल्यानंतर 4 फेब्रुवारीला त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता सत्यजित तांबे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप केले. Congress gave AB form wrongly, this is a big conspiracy; Secret explosion of Satyajit Tambe
काँग्रेसने आम्हाला दिलेले AB फाॅर्म हे चुकीचे होते आणि योग्य फाॅर्म दिल्यानंतरही तो फाॅर्म सुधीर तांबे यांच्या नावाने पाठविण्यात आला. पक्षश्रेष्ठींकडून एवढ्या गंभीर चुका कशा काय होतात. याचाच अर्थ असा की, हे तांबे कुटुंबियांविरोधात मोठे षडयंत्र आहे, असा गौप्यस्फोटच सत्यजित तांबे यांनी केला आहे.
आपण अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो आहोत. त्यामुळे इथून पुढे अपक्ष आमदार म्हणूनच विधान परिषदेत काम करणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरही आपण वारंवार काँग्रेसने त्यांची आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची संपर्क केला होता. परंतु त्या संपर्कात यश आले नाही. काँग्रेस अथवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याला पाठिंबा दिला नाही. काँग्रेसने माझ्यासारख्या निवडून येणाऱ्या उमेदवाराला 6 वर्षांसाठी निलंबित केले. याचा अर्थ त्यांच्या मनात नेमके काय आहे, हेच स्पष्ट होते. त्यामुळे आपण अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो असल्याने इथून पुढेही अपक्ष आमदार म्हणूनच काम करणार असे तांबे यांनी स्पष्ट केले आहे.
Congress gave AB form wrongly, this is a big conspiracy; Secret explosion of Satyajit Tambe
महत्वाच्या बातम्या