नाशिक : भोंदू बाबा अशोक खरातच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर चबर चबर बोलणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद वर गप्प बसल्याची वास्तुस्थिती आज समोर आली. Nashik corporate Jihad
नाशिक मध्ये भोंदू बाबा अशोक खरात याने अंधश्रद्धा आणि धाक धपटशातून कसे, किती आणि केवढे साम्राज्य उभे केले होते, हे सगळे पोलिसांनी एक्सपोज केले. त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यानंतर मराठी माध्यमांना जाग आली मग त्यांनी अशोक खरातची सगळी पाळेमुळे खणून काढल्याचा आव आणत मोठमोठ्या एक्सक्लूज स्टोरीज केल्या. मराठी माध्यमांच्या स्टोरीज बघून नंतर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना “जाग” आली. पोलिसांनी सर्व प्रकारची कठोर कायदेशीर कारवाई केल्यानंतर नाना पटोले, हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, अबू आझमी वगैरे नेते चबर चबर बोलायला लागले. सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची ट्विट करून जेव्हा काही आपणच अशोक खरातची भोंदूगिरी सगळ्या महाराष्ट्रासमोर आणल्याचा आव आणला. Nashik corporate Jihad
सुप्रिया सुळे यांना “साक्षात्कार”
सुप्रिया सुळे यांना तर दिल्लीत महाराष्ट्र एकदम “पुरोगामी” असल्याचा “साक्षात्कार” झाला. त्यांना म्हणे, इतर राज्यांमधल्या खासदारांनी अशोक खरात प्रकरणावरून चिडवले महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात हे काय चालले आहे??, असे सवाल विचारले.
पण ज्या अशोक खरात प्रकरणावरून विरोधी पक्षांचे सगळे नेते चबर चबर बोलले, त्यापैकी एकानेही नाशिक मधल्या कॉर्पोरेट जहाज सारख्या अत्यंत गंभीर प्रकरणावर तोंड सुद्धा उघडले नाही. किंवा ट्विटर वर एक अक्षरही अद्याप लिहिले नाही. सुप्रिया सुळे रोहित पवार यांचे अजून एकही ट्विट आले. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली नाही हर्षवर्धन सपकाळ किंवा नाना पटोले सुद्धा काही बोलले नाहीत.
बारामती बिनविरोधासाठी धडपड
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज एकमेकांशी बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या बिनविरोधावरून बोलत राहिले होते. पण त्यावेळी या नेत्यांनी नाशिकच्या कॉर्पोरेट जिहादवर एकही शब्द काढला नाही. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ढोल पिटून राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना बारामतीतून माघार घ्यायला लावली. काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा तसाच राजकीय संस्कृतीचा ढोल पिटून बारामतीतून माघार सुद्धा घेतली. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या “पुरोगामी” नेत्यांना या सगळ्या राजकारणात नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद एखादे ट्विट करायला सुद्धा वेळ मिळाला नाही.
नाशिक मधला कॉर्पोरेट जिहाद
नाशिक मधल्या कॉर्पोरेट जिहादचे सुद्धा प्रकरण पोलिसांनी बाहेर काढले. त्याच्यावर एसआयटी नेमली. तब्बल 15 पीडित मुली तक्रारी द्यायला बाहेर आल्या. त्यांच्या तक्रारी नोंदवून घेऊन पोलिसांनी कठोर कारवाई करत सहा मुस्लिम तरुणांना अटक करून कोर्टात हजर केले. त्यावेळी त्यांच्या समर्थनासाठी 600 मुस्लिम कोर्टाच्या परिसरात हजर होते. नाशिकच्या इलेक्ट्रॉनिक कंपनीत 2022 पासून हा प्रकार सुरू होता. नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर यासारखा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार घडला. तो पोलिसांनी उघडकीस जाऊन त्यावर कायदेशीर कारवाई केली.
विरोधकांची दांभिकता
नाशिक मधल्या कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण विरोधी पक्षांपैकी एकाही पक्षाने लावून धरले नाही किंवा विरोधी पक्षांमध्ये एकाही नेत्याने त्यावर कुठलीच बडबड केली नाही. सुप्रिया सुळे यांना “पुरोगामी” महाराष्ट्र “प्रतिगामी” झाल्याचा साक्षात्कार झाला नाही. रोहित पवारांना त्यावर ट्विट करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. जितेंद्र आव्हाड आणि अबू आझमी यांचे लक्ष सुद्धा तिकडे गेले नाही. या प्रकरणातून सगळ्यांचे दांभिक राजकीय वास्तव महाराष्ट्रासमोर उघड्यावर आले.
Congress and NCP leaders kept mum over Nashik corporate Jihad
महत्वाच्या बातम्या
- Navjot Kaur Sidhu : नवजोत सिद्धू यांच्या पत्नीने नवीन पक्ष स्थापन केला; घोषणा करताना पती सोबत नव्हते
- अमेरिका – इराण युद्धात म्हणे, मोदी “टेलिफोन ऑपरेटर”; तर मग जे. डी. व्हान्स आणि वांग यी कोण??
- Sabarimala : सुप्रीम कोर्टात केंद्राने म्हटले- शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय चुकीचा
- राहुल गांधी बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचारात??; तर प्रकाश आंबेडकर सुद्धा येणार!!