वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताची सुपरस्टार बॅडमिंटनपटू ऑलिम्पिकवीर पी. व्ही. सिंधू हिने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवत मोलाची कामगिरी केली आहे. सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी अंतिम सामन्यात सिंधूने चीनच्या वँग झीयी हिचा दारुण पराभव करत, विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. सिंगापूर ओपन स्पर्धेत सिंधूने आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं आहे. तसेच या मोसमातील सिंधूचे हे तिसरे विजेतेपद आहे. congratulate pvsindhu1 on winning her first ever Singapore Open title
चुरशीचा सामना
ऑलिम्पिक 2021 मध्ये कांस्यपदक मिळवत देशाची मान उंचावणा-या सिंधूने पुन्हा एकदा दैदीप्यमान अशी कामगिरी केली आहे. सिंगापूर बॅडमिंटन ओपन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूची झुंज ही चीनच्या वँग झी यी हिच्यासोबत होती. अत्यंत चुरशीची अशी ही लढत तब्बल 57 मिनिटे चालली.
सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करायला सुरुवात करत पहिल्या डावात 21-9 असा सहज विजय मिळवला. मात्र दुस-या डावात वँगने कडवा प्रतिकार करत सिंधूचा भेदक मारा रोखण्याचा प्रयत्न केला. दुसरा डाव वँगने 21-11 असा जिंकत सामन्यात सिंधूसोबत 1-1 ची बरोबरी केली.
मोदींनी केले कौतुक
निर्णायक अशा तिसऱ्या डावात सिंधू आणि वँग यांनी जशास तसे उत्तर देत हा डाव चुरशीचा केला. तरीही सिंधूने हा डाव 21-15 असा जिंकून विजेतेपदावर नाव कोरले. सिंधूच्या या विजयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तिचे अभिनंदन केले आहे. तिचे हे विजेतेपद आगामी पिढीला प्रेरणादायी आहे, असे सांगत मोदींनी सिंधूचे कौतुक केले आहे.
congratulate pvsindhu1 on winning her first ever Singapore Open title
महत्वाच्या बातम्या
- छत्तीसगड मध्ये “एकनाथ शिंदे” : मुख्यमंत्र्यांना 4 पानी पत्र लिहून टी. एस. सिंगदेव यांचा ग्रामीण विकास पंचायतराज मंत्रीपदाचा राजीनामा!!
- महाराष्ट्रात “मनातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये” आणखी एकाची भर!!
- 25 राज्यांत अतिवृष्टी : महाराष्ट्रात 99 आणि गुजरातमध्ये 95 जणांचा मृत्यू; तेलंगणात 20 हजार लोकांची सुटका
- राष्ट्रपती पदाची उमेदवारी मागे घेण्याचे यशवंत सिन्हा यांना प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!!