• Download App
    Script 6 : शरदनिष्ठ की अजितनिष्ठ निर्माण झाला पेच; राष्ट्रवादीत आमदारांची चालू खेचाखेच!! Confusion arose between Sharadnishtha and Ajithnishtha

    Script 6 : शरदनिष्ठ की अजितनिष्ठ निर्माण झाला पेच; राष्ट्रवादीत आमदारांची चालू खेचाखेच!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ अशी सिंडिकेट – इंडिकेट विभागणी झाल्यानंतर दोन्ही गट आता आपल्याकडे आमदारांची खेचाखेच करू लागले आहेत. पण राष्ट्रवादीतले आमदार देखील जाम “तयार आणि हुशार: असून ते आपण पवार कुटुंबीयांबरोबर आहोत असे सांगत शरदनिष्ठ की अजितनिष्ठ असा ताकास तूर लागू देत नाहीत!! Confusion arose between Sharadnishtha and Ajithnishtha

    राष्ट्रवादीच्या आमदारांवरून आता दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये संभ्रमावस्था आहे, असं जयंत पाटील म्हणाले. आम्हाला अनेक आमदारांचे फोन आले. असाही दावा जयंत पाटील यांनी केला. जयंत पाटील म्हणाले, बहुसंख्य आमदार आमच्यासोबत आहेत. आम्हाला बऱ्याच आमदारांना फोन आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवार यांनी निर्माण केला आहे. महाराष्ट्रातील तरुणाई फोडाफोडीच्या राजकारण्यांएवजी शरद पवार यांच्यासोबत उभी राहील.

    प्रफुल्ल पटेल म्हणाले…

    तर, बहुसंख्य आमदार आमच्यासोबत आहेत, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हंटलं. प्रफुल्ल पटेल म्हणाले, आमच्याकडे काल किती आमदार होते ते तुम्ही पाहिले. त्यांनी सांगावं. त्यांच्याकडे किती आमदार आहेत. बहुसंख्य आमदार आमच्याबरोबर आहेत. म्हणून अजित पवार येथे येऊन बसला, असं अजित पवार यांनी कडक शब्दात सांगितलं. त्याला प्रफुल्ल पटेल यांनी दुजोरा दिला.

    हे आमदार आहेत संभ्रमावस्थेत

    पारनेरचे आमदार नीलेश लंके म्हणाले की, आम्ही पवार कुटुंबीयांसोबत आहोत. मात्र, कोणते पवार हे त्यांनी सांगितलं नाही. शिरूरचे आमदार अशोक पवार हे दुपारपर्यंत नॉट रिचेबल होते. नंतर त्यांनी फोन घेतला नाही. अकोल्याचे आमदार किरण लहामटे ५ जुलैला होणाऱ्या बैठकीनंतर निर्णय घेईन. पण, कोणत्या पवरांच्या बैठकीला जातील, हे ते बोलले नाहीत.

    पुसदचे आमदार इंद्रनील नाईक म्हणाले, मतदारसंघात जातोय. त्यानंतर वडिलांशी बोलून निर्णय घेणार. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाड कुठे आहेत, माहीत नाही. त्यांनी फोन घेतलेला नाही. जुन्नरचे आमदार अतुल बेनके लोकांची मतं जाणून निर्णय घेणार आहेत. वडगावचे आमदार सुनील टिंगरे हे काही दिवसांनी निर्णय घेणार आहेत. माढाचे आमदार बबन शिंदे चार-पाच दिवसांत भूमिका स्पष्ट करणार आहेत. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे म्हणाले, मला आता काही विचारू नका. मी नंतर स्पष्ट बोलणार.

    देवळालीच्या आमदार सरोज अहिरे अजित पवार यांच्या शपथविधीला होत्या. मात्र त्या नॉट रिचेबल आहेत. अर्जुनीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी म्हटलं की, मतदारसंघात जातो. दोन दिवसानंतर बोलतो, असे सांगून ते निघून गेले.

    Confusion arose between Sharadnishtha and Ajithnishtha

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस