• Download App
    बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार नदीम-श्रवण जोडीतील श्रवण राठोड यांचे कोरोनाने निधन Composer Shravan Rathod dies due to Covid-19 

    बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार ‘नदीम-श्रवण’ जोडीतील श्रवण राठोड यांचे कोरोनाने निधन

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबईः बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार श्रवण (श्रवण राठोड) यांचे मुंबईत रात्री साडेनऊ वाजता निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांना कोरोना झाला होता. मागील काही दिवसांपासून श्रवण यांच्यावर माहीमच्या एस. एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. Composer Shravan Rathod dies due to Covid-19

    कोरोनावर उपचार सुरू होते. मात्र शरीरात नवी गुंतागुंत निर्माण झाली. डॉक्टरांनी श्रवण यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण सर्व प्रयत्न अपुरे पडले.

    गेल्या तीन दिवसांपासून श्रवण राठोड यांची तब्येत बिघडल्याने त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्या दोन किडनी देखील व्यवस्थित काम करत नव्हत्या त्यामुळे डॉक्टरांनी सोमवारी डायलिसिस सुरू केले होते.

    श्रवण यांनी ९०च्या दशकात नदीम यांच्या साथीने अनेक सिनेमांसाठी संगीत दिले. आशिकी (१९९१), साजन (१९९२), दीवाना (१९९३), राजा (१९९६), राजा हिंदुस्तानी (१९९७), परदेस (१९९८), राझ (२००३) या सिनेमांसाठी दिलेल्या संगीताकरिता नदीम-श्रवण जोडीला पुरस्कार मिळाले होते.

    गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नदिम यांचे नाव आल्यानंतर ही जोडी तुटली. नदिम गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होते.

    नदिम श्रवण यांच्या जोडीने दिल है के मानता नही, साजन, सडक, साथी, दिवाना, फुल और काटे, राजा हिंदुस्तानी, जान तेरे नाम, धडकन, राजा, परदेस, दिलवाले यांसारख्या चित्रपटांना संगीत दिले असून त्यांची सगळीच गाणी आजही हिट आहेत.

    संगीतकार नदीम श्रवण यांनी एकाहून एक हिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. या जोडीने नव्वदीचा काळ गाजवला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

    Composer Shravan Rathod dies due to Covid-19

     

    Related posts

    NCP Tatkare : हनीट्रॅपबाबत वडेट्टीवारांचे वक्तव्य मूर्खपणाचे; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पलटवार

    Raj Thackeray, : राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात PI; हिंदी भाषिकांना धमकावल्याचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

    ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची नाही खात्री; पण अमित शाहांनी फडणवीसांना केलेल्या सूचनांची संजय राऊतांकडे “पक्की माहिती”!!