विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात साकीनाका पोलीस स्थानकात एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. राहुल शेवाळे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
शेवाळे यांनी म्हटले आहे की, माझ्यावर करण्यात आलेले आरोप निराधार आहे. माझी प्रतिमा खराब करण्याचा हेतू आहे.Complaint against Shiv Sena MP Rahul Shewale in rape case
मी निर्दोष आहे आणि यासाठी मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. त्याचप्रमाणे माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या बोगस तक्रारीमागील लोकांचा मी नक्कीच पदार्फाश करेल. माझा मुंबई पोलीस आणि कायद्यावर पुर्णत: विश्वास असून याबाबत पोलीस आणि न्याययंत्रणा योग्य निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे.
मी निर्दोष असल्याचं सिध्द करण्यासाठी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. तसेच या तक्रारीमागे असणाऱ्या लोकांचाही पदार्फाश लवकरच करेन”, असंही शेवाळे यांनी स्पष्ट केलं.