विशेष प्रतिनिधी
पुणे : 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसी मधून जेवढे मताधिक्य मिळाले, त्यापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रिया सुळे यांना बारामतीत मिळाले. सुप्रिया सुळे मोदींपेक्षा जास्त मार्जिनने निवडून आल्या, अशी तुलना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत केली. Comparison by Sharad Pawar in public communication in Baramati
नरेंद्र मोदी वाराणसी मध्ये 1.50 लाखांनी निवडून आले, तर सुप्रिया सुळे बारामतीत 1.54 लाखांनी निवडून आल्या, असे पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीनंतरचा विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी शरद पवार बारामती तालुका पिंजून काढत आहेत. बारामती तालुक्यातल्या एका जनसंवाद मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी नरेंद्र मोदी आणि सुप्रिया सुळे यांच्या मार्जिनची तुलना केली.
शरद पवार म्हणाले :
1967 साली मला कठीण काळात विजयी केलं. सोमेश्वर कारखान्याचे बाबलाल काकडे यांच्या विरोधात मला निवडून दिले. मी नुकताच कॉलेज जीवनातून बाहेर आलो होतो. बारामतीमधील तरुण पिढीने मला नेहमीच साथ दिली. आजची निवडणूक ही सुप्रिया सुळे यांची चौथी निवडणूक असताना देखील प्रचंड मतांनी विजयी केलं. बारामती मधील जनतेला कोणतं बटन दाबायचं हे सांगावं लागत नाही. देशाचे पंतप्रधान दीड लाख मतांनी निवडून आले आणि सुप्रिया दीड लाखापेक्षा ज्यास्त मतांनी निवडून आल्या. देशाच्या पंतप्रधान यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या.
शेतकरी अडचणीत कसा येईल, याचा विचार मोदी सरकार करतं. मोदी सरकारमधील लोक म्हणतात आम्ही खाणारे लोकांचा विचार करतो परंतु पिकविणाराने पिकवले नाही तर खाणारा काही खाईल. सत्ताधारी कोणीही असला तरी, त्यांनी काळ्या आईशी इमान राखणाऱ्या लोकांचा विचार केला पाहिजे.
यंदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी ‘मोदी की गॅरंटी’ नावाखाली प्रचार केला. पण ही नरेंद्र मोदींची गॅरंटी ही खरी नसून लोकांची गॅरंटी खरी आहे. मी कृषिमंत्री असताना यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, यामुळे मी खूप अस्वस्थ झालो होतो. तेव्हा देशात आम्ही 75000 कोटी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली.
शरद पवार यांनी बारामतीमधील लाटे, पणदरे या गावांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवणुकीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. 1967 साली राजकारणाची स्थिती वेगळी होती. महाराष्ट्र आणि देशात यावेळेस निवडणूक वेगळी होती. यावर्षी बारामती निवडणूक संबंध देशात गाजली. या वर्षीच्या निवडणुकीत लोकांवर दमदाटी किंवा दबाव आला तरी लोक मतदानाला गेल्यावर योग्य बटन दाबतील ही मला खात्री होती, असे शरद पवार म्हणाले.
Comparison by Sharad Pawar in public communication in Baramati
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश
- राहुल गांधी रायबरेली ठेवणार, वायनाड सोडणार; प्रियांका गांधी तिथून लढणार!!
- अर्थसंकल्प 2024: अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पापूर्वी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार