• Download App
    व्यावसायिक सिलेंडर १०५ रुपयांनी वाढला, घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे; सामान्यांना दिलासाCommercial cylinder price increased by Rs 105

    व्यावसायिक सिलेंडर १०५ रुपयांनी वाढला, घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे; सामान्यांना दिलासा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : व्यावसायिक सिलेंडरच्या दरात १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. परंतु घरगुती सिलेंडरचे दर जैसे ठेवल्याने सामान्य ग्राहकांचा जीव भांड्यात पडला आहे. Commercial cylinder price increased by Rs 105

    पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरचे दर निश्चित करत असतात. त्यानुसार आज त्याची घोषणा केली. या दरवाढीनंतर मंगळवारपासून १९ किलो व्यावसायिक सिलेंडरची किंमत २,०१२ रुपये होणार आहे.


    मोदींच्या GDP तील वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol ची दरवाढ; २३ लाख कोटी रूपये गेले कुठे? राहुल गांधींची सरकारवर टीका


     

    रशिया-यूक्रेन युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढले आहेत. त्यामुळे १ मार्च रोजी एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. सिलेंडरच्या दरात १०५ रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी करण्यात आली आहे. ५ राज्यांच्या निवडणुका सुरू असल्यानं घरगुती सिलेंडरच्या दरात ७ मार्चनंतर वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

    Commercial cylinder price increased by Rs 105

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती