वृत्तसंस्था
नवी दिल्ली : व्यावसायिक सिलेंडरच्या दरात १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. परंतु घरगुती सिलेंडरचे दर जैसे ठेवल्याने सामान्य ग्राहकांचा जीव भांड्यात पडला आहे. Commercial cylinder price increased by Rs 105
पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरचे दर निश्चित करत असतात. त्यानुसार आज त्याची घोषणा केली. या दरवाढीनंतर मंगळवारपासून १९ किलो व्यावसायिक सिलेंडरची किंमत २,०१२ रुपये होणार आहे.
रशिया-यूक्रेन युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढले आहेत. त्यामुळे १ मार्च रोजी एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. सिलेंडरच्या दरात १०५ रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी करण्यात आली आहे. ५ राज्यांच्या निवडणुका सुरू असल्यानं घरगुती सिलेंडरच्या दरात ७ मार्चनंतर वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
Commercial cylinder price increased by Rs 105
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिरे आमच्या समाजाच्या धारणेची साधने, त्यामुळेच एका मंदिरासाठी उभे राहिले मोठे आंदोलन, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
- घराणेशाही वाद्यांनी फक्त आपल्या तिजोऱ्या भरल्या, पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल
- इतिहासातील काही तथ्ये मला लोकांनी सांगितली, मी ती तपासून घेईल, समर्थ रामदास वादाबाबत राज्यपालांनी स्पष्ट केली भूमिका
- छत्रपती संभाजीराजेंचा गौप्यस्फोट, पत्नीने माझ्यावर गनिमी कावा करत स्वत;ही उपोषण केले