विशेष प्रतिनिधी
बीड – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पूस येथील जगमित्र साखर कारखाना घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी अंबाजोगाई येथे आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे सह मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली.Collected for Jagmitra Where did Rs 83 crore go?
धनंजय मुंडे यांनी दहा वर्षात शेतकऱ्यांकडून ८३ कोटी भांडवल म्हणून घेतले. मात्र त्या जागेवर अद्याप दगडही रचण्यात आला नाही. याचे ८३ कोटी गेले कुठे? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याने बरदापुर पोलिसांना चौकशी करावीच लागणार आहे.
परंतु पोलिस चौकशी करण्याच्या मूडमध्ये नाहीत. तर दुसरीकडे अनिल परब यांच्यावर देखील निशाणा साधत परब यांचा बंगला CRZ मध्ये येतो. त्यांनी शंभर कोटीच काय तर दहा लाख कोटींचा दावा केला तरी सजा मिळणारच असं सोमय्या म्हणाले आहेत.
- जगमित्रसाठी गोळा केलेले ८३ कोटी गेले कोठे ?
- साखर कारखान्यासाठी भांडवलाचे काय केले?
- शेतकऱ्यांचा पैसे कोठे गेला आहे, ते सांगा
- दहा वर्षात कारखान्याचा एक दगडही रचला नाही
- अनिल परब यांचा बंगला CRZ मध्ये येतो का?
- किरीट सोमय्या यांचा धनंजय मुंडे यांना सवाल