• Download App
    राष्ट्रवादीच्या आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले, एकाचा मृत्यू; पण पुतण्या दारू प्यायला नसल्याचा दिलीप मोहितेंचा दावा!!|cNCP MLA's Nephew Crushed Both

    राष्ट्रवादीच्या आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले, एकाचा मृत्यू; पण पुतण्या दारू प्यायला नसल्याचा दिलीप मोहितेंचा दावा!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यातल्या बड्या बिल्डर बापाच्या माजलेल्या पोराने पोर्शे कार बेदरकार चालवून दोन इंजिनिअरचा बळी घेतलेली घटना ताजी असतानाच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दोघांना चिडले त्यात एकाचा मृत्यू झाला, तरी देखील आपला पुतण्या दारू प्यायला नव्हता. तो पळूनही गेला नाही, असे “सर्टिफिकेट” दिलीप मोहिते यांनी परस्पर देऊन टाकले.cNCP MLA’s Nephew Crushed Both



    पुण्यातील खेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर मोहिते पाटील याने बेदरकार गाडी चालवून कळंब गावानजीक दोघांना उडवले. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आमदार दिलीप मोहिते पाटील लगेच आपल्या पुतण्याच्या बचावासाठी प्रसार माध्यमांकडे धावले आणि आपला पुतण्या दारू प्यायला नव्हता. अपघातानंतर तो पळून देखील केला नाही असा दावा दिलीप मोहिते पाटील यांनी केला. पण मयूर मोहिते पाटील हा दारू प्यायला होता, तो दारूच्या नशेतच गाडी चालवत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. मयूर मोहिते पाटील यांच्या वहिनी तपासणीत आणि त्याच्या वैद्यकीय रिपोर्ट मध्ये नेमके काय आढळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहेत कारण अगरवाल प्रकरणांमध्ये वैद्यकीय अहवालातच घोळ करून आरोपी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण ताजे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अपघातानंतर मयूर मोहिते पाटील गाडीतच बसून राहिला, तो गाडीबाहेर आलाच नाही, असं स्थानिकांनी सांगितले. आहे.

    कसा घडला अपघात? 

    आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पुतण्या मयूर मोहिते पाटील याने बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीनं चिरडले. या घटनेत ओम भालेराव (वय 19 वर्ष) तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मयूर हा नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेने येत होता. पण तो विरुद्ध दिशेनं सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारनं धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    पण या अपघातानंतर दिलीप मोहिते पाटील आपल्या पुतण्याच्या बचावासाठी प्रसार माध्यमांसमोर आले आणि त्यांनी मयूर मोहिते पाटील हा दारू प्यायला नव्हता अपघातानंतर तो पळूनही गेला नाही, असा दावा केला.

    cNCP MLA’s Nephew Crushed Both

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा