CM Uddhav Thackeray : जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यासमोर सध्या कोरोनाचे आणि पूरस्थितीचे संकट असले तरी मी पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जी जी जबाबदारी पार पाडावी लागेल ती ती जबाबदारी पार पाडू असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. CM Uddhav Thackeray Visits Sangli Flood Affected Area Assures Help To People
वृत्तसंस्था
सांगली : जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यासमोर सध्या कोरोनाचे आणि पूरस्थितीचे संकट असले तरी मी पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जी जी जबाबदारी पार पाडावी लागेल ती ती जबाबदारी पार पाडू असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भिलवडी (ता. पलूस) येथे आले होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ .विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मोहनदादा कदम. आमदार अनिल बाबर, आमदार सुमन पाटील , आमदार अरूण लाड, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी आदी उपस्थित होते.
सांगलीत पुरामुळे ४ लाख लोकांचे स्थलांतर
मुख्यमंत्री भिलवडी येथे बोलताना म्हणाले, कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगली जिल्ह्यात सुमारे ४ लाख लोकांचे स्थलांतर झाले. लोकांचे जीव वाचविण्यास शासनाने प्रथम प्राधान्य दिले. अतिवृष्टी व पुरामुळे लोकांचे आर्थिक, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेती, घरे-दारे, पशुधन यांचे एकूण किती नुकसान झाले याचा अंदाज घेणे सध्या सुरू असून काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता असून त्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील. त्याकरिता आपली तयारी हवी.
कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही
नुकसानीबाबत मी कोणतेही पॅकेज जाहीर करणार नाही तसेच कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे जे आपल्या हिताचे आहे, ते सर्व प्रामाणिकपणे करणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपली जी निवेदने आहेत ती द्या त्यातील सूचनांचा नक्कीच विचार करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी पूरग्रस्तांना दिली.
भिलवडी येथील पूरबाधितांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा अंकलखोपच्या दिशेने रवाना झाला. येथेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पूरग्रस्तांशी अत्मीयतेने संवाद साधत, शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असल्याची ग्वाही अंकलखोपवासियांना दिली.
CM Uddhav Thackeray Visits Sangli Flood Affected Area Assures Help To People
महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra Unlock करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती, दुकानांच्या वेळा, मुंबई लोकलवरही दिले स्पष्टीकरण
- Third Wave of Corona : याच महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट, ऑक्टोबरमध्ये शिखरावर, महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा
- मोठी बातमी : यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही, सरकारने संसदेत दिली माहिती
- राहुल गांधी यांच्याकडून विरोधी पक्षातील खासदारांना नाश्त्याचे आमंत्रण, संसदेबाहेर अधिवेशन चालवण्याच्या तयारीत विरोधक
- तू प्रथम हिंदू धर्म स्वीकार कर, मी लग्नाला तयार, हिंदू तरुणीकडून मुस्लिम प्रियकराला अट ; गुजरातमधील घटना