• Download App
    विधानसभा अध्यक्ष निवडणूक; राज्यपाल - ठाकरे सरकार संघर्ष शिगेला; मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना खरमरीत पत्र|CM uddhav Thackeray letter to governer

    विधानसभा अध्यक्ष निवडणूक; राज्यपाल – ठाकरे सरकार संघर्ष शिगेला; मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना खरमरीत पत्र

    प्रतिनिधी

    मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यावरुन सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिले आहे. विधिमंडळ कायदे हे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाही,CM uddhav Thackeray letter to governer

    असे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यपाल या पत्राला काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडी सरकार उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यावर ठाम आहे.



    राज्यपालांनी सरकारच्या कायद्यांवर अविश्वास दाखवला असे म्हणत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पत्रात निवडणूक घेण्याबाबत सरकार ठाम असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कायदे मंडळाने काय कायदे केले, ते तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

    राज्यपाल महोदयांनी अभ्यासात अनावश्यक वेळ घालवू नये, कायदेशीर आहे की नाही हे तपासण्याच्या उद्योगात पडू नये. आपला हस्तक्षेप करण्याचा संबंधच नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत सरकार आग्रही असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

    विधिमंडळ कायदे हे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणी देखील या पत्रातून केली आहे.

    विधानसभा अध्यक्षपदासाठी नियम बदलण्यात आले आणि ही प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोशियरी यांनी सरकारला आज सकाळी कळवले होते. त्यामुळे आघाडीला मोठा धक्का बसला जात होता. त्यामुळे उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही याबाबतची साशंकता निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा राज्यपालांना पत्र लिहून राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

    CM uddhav Thackeray letter to governer

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!