Shiv Sena Dussehra Melava : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. कोरोना महामारीमुळे यावेळी मोकळ्या जागेवर न होता शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होत आहे. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणे त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. CM Uddhav Thackeray Criticizes Devendra Fadanvis in Shiv Sena Dussehra Melava in Mumbai
प्रतिनिधी
मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. कोरोना महामारीमुळे यावेळी मोकळ्या जागेवर न होता शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होत आहे. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणे त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला.
मी मुख्यमंत्री आहे असं कधीही वाटू नये
आपल्या भाषणाची सुरुवातच उद्धव ठाकरेंनी भाजपवरील टीकेने केली. अजूनही मुख्यमंत्री असल्याचंच मला वाटतंय असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नुकतेच म्हणाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात फडणवीसांच्या या विधानाची खिल्ली उडवली. मी मुख्यमंत्री आहे असं मला कधीच वाटू नये. कारण हल्ली काही लोकांना मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत आहे, पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतायत मी गेलोच नाही, असा टोलाच त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमचे आशीर्वाद घेत असताना माझ्या मनात नेहमी नम्र भावना असते. प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवाह हाच मिळायला पाहिजे. आणि महाराष्ट्रात जन्म व्हायला पाहिजे. आणि मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये. माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. कारण काही जणांना असं वाटतं जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस आहे तिकडेच. पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते. पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील- जातील. पण कधीही अहंपणा डोक्यात येऊ देऊ नको. ज्या दिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे, असंही ते म्हणाले.
आजचा क्षण अत्यंत मोलाचा
ते पु्ढे म्हणाले की, आजचा हा क्षण आपल्या आयुष्यात अत्यंत मोलाचा आहे. सुवर्ण क्षण आहे. शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेली परंपरा आपण पुढे नेत आहोत याचा अभिमान आहे. शस्त्र पूजन झाल्यानंतर खऱ्या शस्त्रांची पूजा केली. ही शस्त्रं म्हणजे तुम्ही आहात. मला कल्पना आहे बऱ्याच दिवसांनी आपल्याला वाव मिळाला आहे. आवाज आपला कुणी दाबू शकत नाही. आवाज दाबणारा जन्माला येऊ शकत नाही. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना दसरा आणि विजया दशमींच्या शुभेच्छा देतो. मलाही बरं वाटलं. कारण मला बऱ्याच दिवसांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनींनो आणि मातांनो अशी हाक देता आली.
लखीमपूरचे शेतकरी परग्रहावरून आले काय?
यावेळी ठाकरे म्हणाले की, मोहन भागवत म्हणतात हिंदू म्हणून आपण एक आहोत. आपले पूर्वज एक होते. मला त्यांना विचारायचंय आपले पूर्वज एक आहेत तर विरोधकांचे पूर्वज परग्रहाहून आले काय? लखीमपूरमधील शेतकरी परग्रहावरून आले का? आंदोलक शेतकरी कुठून आले? मात्र, माझ्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या. तुमच्यावर टीका करतोय असं समजू नका, असंही सांगायला ते विसरले नाहीत.
सरकार पाडता येत नाही म्हणून छापा-काटा सुरू
ठाकरे पुढे म्हणाले की, हे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. पण माझं आजही आव्हान आहे, पाडून दाखवा. पण त्यांना सरकार पाडता येत नाही म्हणून छापा -काटा सुरूय. छापा- काटा टाकायचा आणि काटा काढायचा अशी खेळी सुरू आहे. पण ही थेरं मी अधिक काळ चालू देणार नाही. हर हर महादेव काय असतं हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये. पण आलीच तर दाखवावीच लागेल, असा थेट इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
CM Uddhav Thackeray Criticizes Devendra Fadanvis in Shiv Sena Dussehra Melava in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- सलग दुसऱ्या शुक्रवारी अफगाणिस्तान हादरले : कंधारच्या शिया मशिदीत प्रचंड स्फोट; 37 ठार, 50 हून अधिक जखमी
- संतापजनक : छत्तीसगडमध्ये देवी विसर्जनाच्या मिरवणुकीला गांजा तस्करांच्या भरधाव कारने चिरडले, एकाचा मृत्यू, 26 जण जखमी
- सिंघू बॉर्डरवर तरुणाच्या हत्येची निहंगांची कबुली, म्हणाले- ‘त्याने गुरु ग्रंथ साहिबची बेअदबी केली, फौजेने कापले हात-पाय’
- Cruise Drugs Case : आर्यन खान बनला कैदी नंबर 956, खान कुटुंबाने मनी ऑर्डरने तुरुंगात पाठवले 4500 रुपये
- पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या 7 नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- ’15-20 वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!’