CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी राज्यातील जनतेशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती, मुंबई लोकल सेवा, आरक्षणाचा मुद्दा तसेच महापूरग्रस्तांच्या समस्येवर भाष्य केले. महापुराबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मदत आणि लाँगटर्म योजनेबद्दल सांगून धोकादायक वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल असं म्हटलंय. CM Uddhav Thackeray Assures To Give Relief To Flood Affected People and Long Term Plan on Natural disaster
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी राज्यातील जनतेशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती, मुंबई लोकल सेवा, आरक्षणाचा मुद्दा तसेच महापूरग्रस्तांच्या समस्येवर भाष्य केले. महापुराबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मदत आणि लाँगटर्म योजनेबद्दल सांगून धोकादायक वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल असं म्हटलंय.
या ऑनलाइन संबोधनात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री आल्यानंतर एका पॅकेजची घोषणा करतात अशी परंपरा आहे. मी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पॅकेजची घोषणा करणार नाही पण सगळ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. आजदेखील अनेक पालकमंत्री आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी हजर आहेत. आम्ही एक आढावा घेतला की काय करता येईल? आम्ही साडे अकरा हजार कोटींचा निधी जाहीर केला. तात्काळ मदत आणि लॉंगटर्म योजना करत आहोत. आपल्याला धोकादायक वस्त्यांचं पूनर्वसन करावं लागेल. तसेच पुराचं व्यवस्थापन करण्यासाठी दुरगामी योजना आखाव्या लागतील, असेही ते म्हणाले.
चार लाख नागरिकांचं स्थलांतर
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, ज्या नैसर्गिक आपत्तीला आपल्याला तोंड द्यावं लागत आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळ आपल्याला धडकलं. यावेळी तौत्के चक्रीवादळ आपल्या किनाऱ्याला स्पर्श केलं. त्याने करायचं तेवढं नुकसान केलंच. त्यानंतर जो काही पूर आला ते सगळं विचित्र होतं. काही दिवसांचा, काही महिन्यांचा पाऊस एका दिवसात आणि काही तासात कोसळायला लागला. याची काही कारण आपण काहीह देऊ शकतो. वेध शाळेने याचा अपल्याला अंदाज दिला होता. पण तो इतक्या भीषण राहील असं कुणाला माहिती नव्हतं. काही ठिकाणी धरणाचं पाणी कमी करावं लागलं. त्यामुळे नद्यांना पूर आलं. आता हे दरवर्षाचं संकट त्यातून येणारी आपत्ती. त्यातल्या त्यात अतिवृष्टीचा इशारा सांगितल्यानंतर आपल्या प्रशासनाने जवळपास साजेचार लोकांचं स्थलांतर केलं. आपण जीवितहानी होऊ दिलं नाही. मात्र, ज्या दरडी कोसळल्या त्यात आपले रस्ते खचले. तसेच घाटही खचले. तसेच दरडी कोसळून गावचे गाव उद्धवस्त झाले. डोंगराच्या खाली आपले बांधव, मात-भगिनी गाडले गेले. दरडी कोसळणे, पूर येण्याचे प्रामाण लाढायला लागले आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनग वितळणार आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढेल, असं म्हटलं जातंय.
CM Uddhav Thackeray Assures To Give Relief To Flood Affected People and Long Term Plan on Natural disaster
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने आरक्षणाची 50 टक्क्यांची अट शिथिल करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी
- मोठी बातमी : 15 ऑगस्टपासून सुरू होणार मुंबई लोकल, दोन डोस घेतलेल्यांना मिळेल प्रवासाची परवानगी
- Tokyo Olympics चा रंगतदार समारोप, बजरंग पुनियाच्या हाती भारताचा तिरंगा, आता तीन वर्षांनी पॅरिसमध्ये भिडणार चॅम्पियन्स
- Neeraj Chopra : नीरज चोप्राचा सोशल मीडियावरही धमाका, 24 तासांत 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स
- Corona Vaccination : केंद्राने राज्यांना दिले 52 कोटींहून अधिक डोस, देशात कोरोना संसर्गातही कमालीची घट