• Download App
    मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा राहुल गांधींवर निशाणा, म्हणाल्या- काँग्रेसला अनेकदा सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही, या राज्यांत करणार पक्षाचा विस्तार! । CM Mamta Banerjee targeted Rahul Gandhi, also told in which states the party will not expand

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा राहुल गांधींवर निशाणा, म्हणाल्या- काँग्रेसला अनेकदा सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही, या राज्यांत करणार पक्षाचा विस्तार!

    CM Mamta Banerjee : तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) विस्तारासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विविध राज्यांना भेटी सुरू केल्या आहेत. मुंबईत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. नाव न घेता त्या म्हणाल्या, जर कोणी काही करत नसेल, परदेशात राहत असतील, तर मग कसे चालेल? त्यामुळे आम्हाला इतर अनेक राज्यांत जावे लागले.” CM Mamta Banerjee targeted Rahul Gandhi, also told in which states the party will not expand


    प्रतिनिधी

    मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) विस्तारासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विविध राज्यांना भेटी सुरू केल्या आहेत. मुंबईत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. नाव न घेता त्या म्हणाल्या, जर कोणी काही करत नसेल, परदेशात राहत असतील, तर मग कसे चालेल? त्यामुळे आम्हाला इतर अनेक राज्यांत जावे लागले.”

    मुंबईत सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांशी संवाद साधताना ममता म्हणाल्या, “आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांची टीम बनवा, असे मी काँग्रेसला अनेकदा सांगितले पण काँग्रेसने ऐकले नाही. तुम्ही संपूर्ण भारतभर नागरी समाजाची एक समिती स्थापन करावी आणि काय करायचे ते आम्हाला सांगावे अशी आमची इच्छा आहे. जर एखादा निरपराध तुरुंगात असेल तर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू.

    अलीकडच्या काळात ममता बॅनर्जी काँग्रेसच्या विरुद्ध आवाज उठवत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे अनेक नेते टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. मेघालयमध्ये १२ आमदारांनी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी गोव्यात टीएमसी पहिल्यांदाच जोरात प्रचार करत आहे. येथे भाजपची सत्ता असून काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे.

    कोणत्या राज्यांत तृणमूलचा विस्तार करणार?

    मुख्यमंत्री ममता म्हणाल्या की, आमच्या बंगालमध्ये सर्व काही ठीक आहे, पण आम्हाला बाहेर पडावे लागले. आमच्या येण्याने स्पर्धा वाढेल. सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आल्यास भाजपला जावे लागेल. यावेळी त्यांनी भाजप हटाओ देश बचाओचा नाराही दिला. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत लढू, असेही त्या म्हणाल्या. आम्ही महाराष्ट्रात येणार नाही, जिथे प्रादेशिक पक्ष चांगले काम करत असतील तिथे आम्ही जाणार नाही. आमच्या प्रादेशिक सहकाऱ्यांना साथ देऊ, असेही त्यांनी सांगितले.

    काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हादेखील ममता बॅनर्जी यांच्या मुंबईतील भेटीदरम्यान दिसले. या कार्यक्रमात जावेद अख्तर, महेश भट्ट, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, सुधींद्र कुलकर्णी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेनन यांसारखे चित्रपटसृष्टीशी संबंधित लोक उपस्थित होते.

    CM Mamta Banerjee targeted Rahul Gandhi, also told in which states the party will not expand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य