• Download App
    नाशिक मधील जिंदाल कंपनीला आग; मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी जाऊन पाहणी; दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश CM Eknath Shinde visited Jindal company fire spot in nashik and also visited hospitals

    नाशिक मधील जिंदाल कंपनीला आग; मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी जाऊन पाहणी; दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

    प्रतिनिधी

    नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या भीषण आगीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी केली. तसेच या आगीच्या घटनेमागील कारणे शोधून काढण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. CM Eknath Shinde visited Jindal company fire spot in nashik and also visited hospitals

    या वेळी बंदरे व खनिकर्म मंत्री पालकमंत्री तथा दादाजी भुसे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन.डी., मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल हेदेखील उपस्थित होते.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. तेथे जिंदाल कंपनीच्या आगीची घटना समजताच त्यांनी सिल्लोड दौरा आटोपून नाशिकला येण्याचा निर्णय घेतला. नाशिक मध्ये येऊन प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली.

    CM Eknath Shinde visited Jindal company fire spot in nashik and also visited hospitals

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!