विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही, यावर चर्चांना उधाण आले असताना फडणवीस यांनी यावर भाष्य करताच चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. माझ्यावर पक्ष फोडल्याचे आरोप केले जातात. पण जर कोणी म्हटले की, मी ठाकरे बंधूंना एकत्र केले, तर त्याचे श्रेय घेण्यास मला आनंदच वाटेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रीकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका मांडली.Devendra Fadnavis
एकनाथ शिंदेसोबत गैरसमज नसून त्यांचे नाते दृढ असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील मुसळधार पावसामुळेच शिंदे एका मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिले होते, हेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या गैरसमजांना त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. ‘एबीपी’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सर्व प्रश्नांची अतिशय दिलखुलासपणे उत्तरे दिली.Devendra Fadnavis
शिवाजी महाराज केवळ मराठ्यांचेच नव्हते, तर ओबीसींसह सर्व समाजाचे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांनी सरकारची ठाम भूमिका मांडली. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणे ही आमची ठाम भूमिका आहे, असे ते म्हणाले. अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोस्टरवरून निर्माण झालेल्या वादाबाबतही त्यांनी भाष्य केले. शिवाजी महाराज केवळ मराठ्यांचेच नव्हते, तर ओबीसींसह सर्व समाजाचे होते. या पोस्टरचा उद्देश जातीयवाद पसरवणे नव्हता, तर शिवाजी महाराजांच्या समावेशकतेचा संदेश देणे हा होता, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की, या पोस्टरमुळे केवळ जातीयवादी मानसिकता असलेल्या लोकांना डिवचले गेले आहे. त्यामुळे ओबीसी समुदायाला आरक्षणाच्या प्रश्नावर हानी पोहोचणार नाही, तसेच मराठा समाजालाही न्याय मिळेल, यावर सरकार ठाम आहे, हे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
उद्या निवडणुका लागल्या तरी आम्ही सज्ज
मुंबई मनपाच्या निवडणुकांबाबत बोलताना फडणवीसांनी सरकारवर होत असलेले आरोप फेटाळून लावले. बीएमसी निवडणुका सरकारने थांबवल्या नाहीत, तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्या पुढे ढकलल्या गेल्या. आमचे सरकार या निवडणुकांसाठी पूर्णपणे तयार आहे. उद्या निवडणुका लागल्या तरी आम्ही सज्ज आहोत, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने 30 जानेवारीपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिले असून, राज्य निवडणूक आयोगाने त्यानुसार तीन टप्प्यात निवडणुका घेण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे बीएमसीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी युती पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याचा आरोप फडणवीसांनी ठामपणे नाकारला.
तरुणांसाठी संधी निर्माण केल्यामुळेच विरोधकांचा प्रयत्न फोल
भारतातील तरुण पिढीच्या भूमिकेवर भाष्य करताना फडणवीसांनी विरोधकांवरही टीका केली. भारताची तरुण लोकसंख्या हा एक महत्त्वाचा लाभांश आहे, ज्याचा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समजून घेतला आणि तरुणांना संधी उपलब्ध करून दिल्या. राहुल गांधी कितीही प्रयत्न करून तरुणांना भडकवण्याचा किंवा त्यांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाहीत. कारण आजच्या तरुणांना दिशा मिळाली आहे आणि ते ठामपणे भविष्याकडे वाटचाल करत आहेत, असे फडणवीस म्हणाले. मोदी सरकारने तरुणांसाठी संधी निर्माण केल्यामुळेच विरोधकांचा प्रयत्न फोल ठरेल, असे त्यांचे स्पष्ट मत आहे.
शिंदे गट जरांगे यांना निधी पुरवत असल्याच्या चर्चांना फेटाळले
फडणवीसांना मुलाखतीत मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या फंडिंगबाबतही विचारण्यात आले. पोलिसांनी सादर केलेल्या यादीत शिंदे गटाच्या सदस्यांची नावे असल्याची चर्चा होत असताना फडणवीसांनी त्यावर भाष्य करताना सांगितले की, मी अशी कोणतीही यादी पाहिलेली नाही. मला माहिती मिळते की आंदोलनाला निधी कोण देतो, पण त्यावर मी अधिक भाष्य करू इच्छित नाही. शिंदे गट जरांगे-पाटील यांना निधी पुरवत असल्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावत सांगितले की, मला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे या प्रकरणावर सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही, मात्र अफवांना फडणवीसांनी आळा घालण्याचा प्रयत्न केला. एकूणच ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्रीकरणापासून ते मराठा आरक्षण, बीएमसी निवडणुका आणि आंदोलनाच्या फंडिंगपर्यंत अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी सरकारची ठाम भूमिका या मुलाखतीत मांडली.
Ready For Elections, Says Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- India Drone : ऑक्टोबरमध्ये भारताचा ड्रोन- काउंटर-ड्रोन सराव; एअर मार्शल म्हणाले- पाकिस्तान आपल्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतोय
- Karunanidhi : करुणानिधी यांच्या पुतळ्याच्या स्थापनेला सर्वोच्च स्थगिती; राजकारण्यांचा गौरव करण्यासाठी सार्वजनिक पैशाचा वापर करू नका
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- मानहानी गुन्ह्याच्या श्रेणीतून काढून टाकावी; जेएनयूच्या माजी प्राध्यापकांना नोटीस
- Bangladesh : न्यूयॉर्कमध्ये बांगलादेशी विद्यार्थी नेत्यावर अंडी फेकली; हसीनांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दहशतवादी म्हटले