• Download App
    CM Devendra Fadnavis महायुतीत भाजपने स्वतःसह घटक पक्षांच्या ढकलले स्वबळाच्या दिशेने; नेमका अर्थ काय??

    महायुतीत भाजपने स्वतःसह घटक पक्षांच्या ढकलले स्वबळाच्या दिशेने; नेमका अर्थ काय??

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र अशा दोन विभागांचा दौरा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजप नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दीर्घ बैठका घेतल्या. नाशिक आणि पुण्यामध्ये घेतलेल्या या बैठकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्य मार्गदर्शन केले. पण त्या मार्गदर्शनानंतर नाशिक आणि पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी जे बोलले, त्यातले between the lines काढायचे झाल्यास महायुतीची वाटचाल घटक पक्षांच्या स्वबळाच्या दिशेने होत असल्याचेच दिसून आले. CM Devendra Fadnavis

    महायुतीने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव करून जे अभूतपूर्व यश मिळविले, त्यामुळे महायुतीतल्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा आत्मविश्वास बराच वाढला. तिथूनच खरंतर स्थानिक पातळीवरच्या निवडणुका स्वबळाच्या दिशेने जायला सुरुवात झाली. कारण महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाला, विशेषत: भाजपला राज्यामध्ये सर्वत्र हातपाय पसरायची संधी निर्माण झाल्याचे दिसले. किंबहुना भाजपचा अजेंडाच हा आहे, की 2029 ची विधानसभा निवडणूक त्यांना महाराष्ट्रात स्वबळावर लढून स्वबळावर जिंकायची आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बळ देऊन जितके हातपाय पसरता येतील, तितके भाजप पसरणार आहे, मग त्यासाठी कधी मित्र पक्षांची संघर्ष करावा लागला किंवा कुठे हातमिळवणी करावी लागली आणि त्यासाठी स्थानिकांची काही प्रमाणात नाराजी सहन करावी लागली तरी मोठ्या ध्येयावर नजर ठेवून भाजपचे वरिष्ठ नेते तशा पद्धतीच्या तडजोडी करण्याच्या मूडमध्ये आहेत. किंबहुना तो त्यांचा धोरणात्मक भाग आहे.

    खरी गरज शिंदे + अजितदादांना

    म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना शक्य तिथे महायुती अन्यथा कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या आग्रहास्तव आणि पक्षाच्या बळानुसार स्वबळावर निवडणूक लढविण्याचे स्पष्ट सांगितले. तसेही महाराष्ट्रातले भाजपचे वाढते बळ लक्षात घेता महायुतीची खरी गरज भाजपा पेक्षा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्याहीपेक्षा अजित पवारांची राष्ट्रवादी यांना जास्त आहे. कारण या दोन्ही नेत्यांच्या पक्षांची ताकद आणि या नेत्यांचा राजकीय वकुब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांपेक्षा कितीतरी कमी आहे. एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार असोत, सत्तेच्या वळचणीशिवाय स्वबळावर निवडणूक लढवून फार मोठे यश तर सोडाच, मर्यादित यश मिळविणे ही कठीण आहे. कारण या दोघांकडेही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या इतके करिश्माई नेतृत्व नाही. भाजपच्या संघटनेच्या आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या बळावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आपापल्या पक्षांचे राजकीय अस्तित्व टिकवून आहेत. त्या पलीकडे स्वबळावर राजकीय अस्तित्व टिकवण्याची या दोन्ही नेत्यांची क्षमता फारच मर्यादित किंबहुना कमकुवत आहे.

    – फारच मर्यादित ताकद

    जिथे खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचीच सर्वोत्तम राजकीय ताकद 50 – 60 आमदार निवडून आणायच्या पलीकडे नाही, तिथे त्यांच्या पक्षांमधून फुटून निघालेले दुसऱ्या फळीतले नेते म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे स्वबळावर आमदार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधले लोकप्रतिनिधी निवडून आणायची क्षमता असून – असून किती असणार??, हा खरा सवाल आहे आणि त्याचे उत्तर “फारच मर्यादित” या दोनच शब्दांनी देता येऊ शकेल.

    – मैत्रीपूर्ण लढती, खुलेआम मोकळीक

    त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या शक्य तर महायुती आणि कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा आग्रह असेल, तर स्वबळ या वक्तव्याचे between the lines हेच खरे की भाजपला स्वतःच्या विस्तारासाठी महायुती हवी आहे. दोन घटक पक्षांच्या विस्तारासाठी नकोय. पण भाजपचा फायदा त्या दोन्ही पक्षांना जाता जाता झाला तर चालणार आहे. कारण भाजपची दीर्घ दृष्टी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पलीकडची 2029 च्या विधानसभा निवडणुकीकडे आहे. त्यामुळे भाजपला महायुती टिकवायची आणि त्याच वेळी पक्ष विस्तार करायचा अशा दुहेरी भूमिकेतून वाटचाल करायची आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे महायुती टिकवून निवडणुका लढवू. स्वबळावर लढलो, तरी मित्र पक्षांबरोबर मैत्रीपूर्ण लढती करू, असे वक्तव्य करून स्वबळाची दिशा स्पष्ट केली आहे. म्हणजेच निवडणूक स्वबळावर लढविली, तरी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी महायुतीच्या घटक पक्षांना एकत्र यायची मोकळीक फडणवीसांनी खुलेआम ठेवली आहे.

    CM Devendra Fadnavis confirmed the party’s full preparation for local body elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची टीका- उद्धव ठाकरे MIM काय, पाकलाही सोबत घेतील; कधी घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडत आहेत

    Ajit Pawar : ‘हंबरडा’ मोर्चा काढणाऱ्यांनी सत्तेत असताना काय केले? अजित पवारांचा सवाल, उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला

    Chandrashekhar Bawankule : जमीन मोजणी आता 120 ​​​​​​​दिवसांऐवजी 30 दिवसांत; 3.12 कोटी प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार