विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने मोठ्या विजय मिळवल्यानंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताना राजकीय दृष्ट्या जड चालले होते, ते देवेंद्र फडणवीस यांच्या एका ग्वाहीने हलके झाले.
महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण, ही तांत्रिक बाब आहे. आम्ही सगळे निर्णय एकत्र बसूनच घेतो आणि इथून पुढेही तसेच एकत्र बसून निर्णय घेऊ, अशी ग्वाही नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यातून त्यांनी एकनाथ शिंदेंचा “पॉलिटिकल कम्फर्ट” वाढविला. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याची विनंती केली. त्याबद्दल सायंकाळपर्यंत निर्णय देऊ, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महायुती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणे जड चालले होते. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातला विषय व्यवस्थित हाताळल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणे भाग पडले पण ते करण्यासाठी जो “पॉलिटिकल कम्फर्ट झोन” तयार करणे आवश्यक होते, तो देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याने झाला.
राजभवनात राज्यपालांकडे सत्ता स्थापनेच्या दावा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण??, ही तांत्रिक बाब आहे आम्ही सगळे निर्णय एकत्र बसूनच घेऊ, असे वक्तव्य केल्याने एकनाथ शिंदे यांच्यासाठी “पॉलिटिकल कम्फर्ट झोन” झोन तयार झाला.