विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय अनपेक्षित बातमी समोर आल्याच्या थाटात प्रत्यक्षात ताटातलं वाटीत आणि वाटीतल्या ताटातचं घडलं आहे. शरद पवारांच्या निष्ठावंत सोनिया दुहान गरवारे क्लब मध्ये अजित पवारांच्या मेळाव्यात मागच्या दाराने पोहोचल्या आहेत. CM Ajit Pawar holds a meeting of the party leaders at the Garware Club in Mumbai.
शरद पवारांच्या “लेडी जेम्स बाँड” अशी ओळख असलेल्या दुहान यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या विचारमंथन बैठकीला मागच्या दाराने हजेरी लावली. त्यानंतर आज दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास सोनिया दुकान शरद पवारांची “तुतारी” खाली ठेवूनत अजितदादांचे “घड्याळ” बांधणार आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा आणि युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची वाट धरली आहे. सोनिया दुहान यांनी मागच्या दाराने लपूनछपून अजितदादांच्या बैठकस्थळी प्रवेश केला. धीरज शर्मा यांच्यासोबत सोनिया दुहान शरद पवारांना रामराम ठोकून अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा कालपासूनच होत्या. राजकीय वर्तुळाच्या भुवया या बातमीने उंचावल्या होत्या, तरी अनेकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. मात्र आज सोनिया दुहान यांच्या पक्षांतराची बातमी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षासाठी हा मोठा धक्का असल्याचे वर्णन मराठी माध्यमांनी केले आहे.
विशेष म्हणजे, जो माणूस स्वतःच्या आई-वडिलांचा, कुटुंबाचा होऊ शकला नाही, तो एखाद्या देशा-प्रदेशाचा होऊ नाही शकत. आमची ओळख, आमचं पक्ष चिन्ह हे शरद पवार आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत, असं सोनिया दुहान यांनी साधारण तीन महिन्यांपूर्वी ठणकावून सांगितलं होतं. सोनिया दुहान यांनी “अंत जल्दी आयेगा” अशा शब्दात अजितदादा गटाला इशाराही दिला होता.
लोकसभा निवडणुकांचे महाराष्ट्रातील सर्व टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. अद्याप निकाल जाहीर होण्यास आठवड्याभराचा अवधी बाकी आहे. कालच अजित पवार यांनी शरद पवारांशी जुळवून घेण्याची तयारी दर्शवली होती. आता दुहान यांच्या माध्यमातून शरद पवारांनी आपला दूत पाठवला आहे का??, अशा चर्चा रंगल्या आहेत.
पण मराठी माध्यमांमध्ये अशा कितीही चर्चा रंगल्या असल्या, तरी प्रत्यक्षात पवारांनी बाकी दुसऱ्या कोणाला नव्हे, तर आपल्याच पक्षातल्या दूताला आपल्याच पक्षातून फुटून निघालेल्या दुसऱ्या पक्षात पाठविले आहे. याचा अर्थ ताटातलं वाटी किंवा वाटीतलं ताटात एवढेच घडले आहे!!
CM Ajit Pawar holds a meeting of the party leaders at the Garware Club in Mumbai.
महत्वाच्या बातम्या
- सावरकर जयंती दिनी अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचे विशेष स्क्रीनिंग!!
- वर्क फ्रॉम होम ऐकलं होतं, वर्क फ्रॉम जेल पहिल्यांदाच पाहिलं, राजनाथ सिंग यांचा केजरीवालांना टोला!!
- १ जूनपासून बदलणार ‘हे’ ५ नियम ; जाणून घ्या, तुमच्या खिशावर किती परिणाम होणार? नियमांचे उल्लंघन झाले तर किती भरावा लागणार दंड
- नवी दिल्लीत भीषण दुर्घटना! बेबी डे केअर सेंटरमध्ये लागलेल्या आगीत सात बालकांचा मृत्यू