नोव्हेंबर महिन्यात नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं समोर आलं आहे. Citizens in the state respond to the second dose of the vaccine; 38 percent of citizens complete both doses
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना रुग्णांची घटती संख्या ही समाधानाची बाब आहे, मात्र अजूनही आपली कोरोना विरुध्दची लढाई संपलेली नाही. लसीकरण मोहिमेला गती देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार राज्यांच्या मदतीनं ‘हर घर दस्तक’ अभियान राबवले आहे.दरम्यान ऑक्टोबर महिन्यात लसीकरणाचा वेग काही प्रमाणात मंदावला असल्याचं दिसून आलं होतं.मात्र आता पुन्हा नोव्हेंबर महिन्यात नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं समोर आलं आहे.
राज्यात आता नागरिक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रतिसाद देत आहेत. गेल्या दहा दिवसात राज्यात जवळपास २४ लाख नागरिकांनी लसीचा पहिला डोस तर, ३० लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याची नोंद आहे. दिवाळीपूर्वी अडीच ते तीन लाख नागरिकांना लस देण्यात आली.
दिवाळीच्या दिवसांत नागरीक लसीकरणासाठी फारसं पुढे आले नाहीत. त्यामुळे लसीकरणाचा आकडा खाली आल्याचं म्हटलं जातंय. तर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लसीकरणाचा वेग सात लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.सध्याच्या परिस्थितीत राज्यात सुमारे ७७ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ३८ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.
Citizens in the state respond to the second dose of the vaccine; 38 percent of citizens complete both doses
महत्त्वाच्या बातम्या
- दुबईतून आणलेल्या पाच कोटींच्या आलिशान कार जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई; रॅकेटचा पर्दाफाश
- महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे वऱ्हाड निघाले दुबईला; तिजोरीत खडखडाट असताना दौरा; ५४ अधिकारीही दिमतीला
- अहमदनगर : सेंट्रल एक्सलन्स इन्सि्टट्यूट उभारले जाणार ,३० कोटी रुपये खर्च ; उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
- ‘मन ही मन तुझे चाहा…’ अमृता फडणवीस यांचं नवं गाण झालं लॉन्च ; चाहत्यांनी दिला मोठा प्रतिसाद
- शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केला १०० कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप
- पाकिस्तानातून चीनला जाणारे रेडिओॲक्टिव्ह पदार्थ मुंद्रा पोर्टवर जप्त, कस्टम आणि महसूल गुप्तचर विभागाची कारवाई