• Download App
    Yugendra Pawar युगेंद्र पवारांच्या लग्नात नाताळच्या घंटांचे डेकोरेशन; सुप्रिया सुळे यांनी केले फोटो शेअर!!

    युगेंद्र पवारांच्या लग्नात नाताळच्या घंटांचे डेकोरेशन; सुप्रिया सुळे यांनी केले फोटो शेअर!!

    नाशिक : एकीकडे महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकींची रणधुमाळी उडाली असताना दुसरीकडे मुंबईत शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा हाय प्रोफाईल विवाह सोहळा निवडक आमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला. युगेंद्र पवारांच्या विवाह समारंभातील डेकोरेशन एवढे आकर्षक होते की त्याचे फोटो स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केले. युगेंद्र पवार यांच्या लग्नात नाताळच्या घंटांचे सुरेख डेकोरेशन केले होते.

    महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना युगेंद्र पवार यांचे मुंबईत हाय प्रोफाईल लग्न झाले. या लग्नाला शरद पवार, राज ठाकरे, प्रफुल्ल पटेल आणि अन्य बड्या नेत्यांनी हजेरी लावली. शरद पवार यांच्या घरचेच कार्य असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने या लग्नात सहभाग घेतला. त्या युगेंद्र पवारच्या वरातीत नाचल्या. आपल्या बहिणींबरोबर फुगड्या खेळल्या. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ मराठी माध्यमांनी व्हायरल केले.



    मात्र अजित पवार आणि रोहित पवार हे नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत अडकल्याने ते लग्नाच्या दिवशी मुंबईत हजर नव्हते. अजित पवार आणि रोहित पवार यांनी हळदीच्या दिवशी तिथे हजेरी लावली होती.

    – घंटांचे डेकोरेशन

    युगेंद्र पवारांचे लग्न मुंबईत मोठ्या सभागृहात झाले. या सभागृहातले डेकोरेशन पवारांच्या घरच्या लग्नाला साजेल असे हाय प्रोफाईल आणि आकर्षक होते‌. रोहित पवार आणि अजित पवार सोडून बाकी सगळे पवार कुटुंब या लग्नाला नटून थटून हजर होते. लग्नाच्या स्टेजचे डेकोरेशन तर विशेष आकर्षक होते. संपूर्ण स्टेज गुलाबी रंगांच्या फुलांच्या भाराने सजविले होते. छताला मेघडंबरी सारखा आकार देऊन त्यावर मोठ मोठ्या घंटा टांगल्या होत्या. नाताळच्या जिंगल बेल्ससारखा त्या मोठ्या घंटांचा आकार होता.

    खासदार सुप्रिया सुळे यांनी या शानदार सोहळ्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केले. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी या दांपत्याला भावी विवाहित जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

    Christmas bells decoration at Yugendra Pawar’s wedding

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कार्यकर्त्यांनी कष्ट केले, तर काय होते, हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले!!

    देवाभाऊंच्या पक्षाचा वरून पहिला नंबर, तर शरद पवारांच्या पक्षाचा खालून पहिला नंबर; राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सोशल मीडियावर सामसूम!!

    महाराष्ट्रात भाजपच नंबर 1; 129 नगराध्यक्ष, 3325 नगरसेवक निवडून आणून रेकॉर्ड!!