नाशिक : एकीकडे महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकींची रणधुमाळी उडाली असताना दुसरीकडे मुंबईत शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा हाय प्रोफाईल विवाह सोहळा निवडक आमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला. युगेंद्र पवारांच्या विवाह समारंभातील डेकोरेशन एवढे आकर्षक होते की त्याचे फोटो स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केले. युगेंद्र पवार यांच्या लग्नात नाताळच्या घंटांचे सुरेख डेकोरेशन केले होते.
महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना युगेंद्र पवार यांचे मुंबईत हाय प्रोफाईल लग्न झाले. या लग्नाला शरद पवार, राज ठाकरे, प्रफुल्ल पटेल आणि अन्य बड्या नेत्यांनी हजेरी लावली. शरद पवार यांच्या घरचेच कार्य असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने या लग्नात सहभाग घेतला. त्या युगेंद्र पवारच्या वरातीत नाचल्या. आपल्या बहिणींबरोबर फुगड्या खेळल्या. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ मराठी माध्यमांनी व्हायरल केले.
मात्र अजित पवार आणि रोहित पवार हे नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत अडकल्याने ते लग्नाच्या दिवशी मुंबईत हजर नव्हते. अजित पवार आणि रोहित पवार यांनी हळदीच्या दिवशी तिथे हजेरी लावली होती.
– घंटांचे डेकोरेशन
युगेंद्र पवारांचे लग्न मुंबईत मोठ्या सभागृहात झाले. या सभागृहातले डेकोरेशन पवारांच्या घरच्या लग्नाला साजेल असे हाय प्रोफाईल आणि आकर्षक होते. रोहित पवार आणि अजित पवार सोडून बाकी सगळे पवार कुटुंब या लग्नाला नटून थटून हजर होते. लग्नाच्या स्टेजचे डेकोरेशन तर विशेष आकर्षक होते. संपूर्ण स्टेज गुलाबी रंगांच्या फुलांच्या भाराने सजविले होते. छताला मेघडंबरी सारखा आकार देऊन त्यावर मोठ मोठ्या घंटा टांगल्या होत्या. नाताळच्या जिंगल बेल्ससारखा त्या मोठ्या घंटांचा आकार होता.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या शानदार सोहळ्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केले. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी या दांपत्याला भावी विवाहित जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
Christmas bells decoration at Yugendra Pawar’s wedding
महत्वाच्या बातम्या
- Lt Gen Manjinder Singh : लेफ्टनंट जनरल म्हणाले- पाकने 90 तासांत गुडघे टेकले, ऑपरेशन सिंदूरमध्ये दीर्घ लढाईची तयारी होती
- Adani : अदानींनी 5 वर्षांपूर्वीचा कायदेशीर खटला संपवला; कोळसा खाण प्रकरणात ऑस्ट्रेलियाच्या कार्यकर्त्याशी समझोता
- पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत कंबर कसून उतरल्या का नाहीत??
- भय्याजींच्या दूरदृष्टीतून ईशान्य भारतात ईश्वरी कार्य ऊभे; भैय्याजी जोशींचे गौरवोद्गार; भैय्याजी काणे जन्मशताब्दी सांगता