विशेष प्रतिनिधी
जळगाव : चोपडा तालुक्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरी मुळे तर कधी शेतीमालाला कमी भाव मिळत असल्याने संकटात सापडलेला दिसतो आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त केळी लागवड केली जाते. परंतु चोपडा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीला भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहेत.Chopda banana growers Concerned due to low price of banana
देशातील सर्व वस्तूंचे दर वाढत आहे महागाई वाढत आहे. मात्र, केळीला भाव मिळत नाही. सरकारने केळीला फळाचा दर्जा देऊन शालेय पोषण आहारात केळीच्या समाविष्ट करावा, अशी मागणी आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित व प्रगतशील शेतकरी डॉ. रविंद्र निकम यांनी केली आहे.
- चोपड्याचे केळी उत्पादक कमी भावामुळे चिंतेत
- निसर्गाची लहर आणि भाव पडल्याने हैराण
- केळी उत्पादक संकटात सापडले
- पोषण आहारात केळी समाविष्ट करण्याचा आग्रह