विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर बीड जिल्ह्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दिवसाला माझ्यावर १०० गुन्हे दाखल केले तरी मी बोलत राहणारच, असे वाघ यांनी म्हटले आहे.Chitra Wagh has been charged with defamation for allegeing raping the president of the Nationalist congress Youth Front president
महाविकास आघाडीचे सरकार बलात्काऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी आपली बदनामी केली म्हणून बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे हा गुन्हा दाखल केला आहे.
यावर चित्रा वाघ यांनी थेट सरकारला आवाहन दिले आहे. त्या म्हणाल्या, मी चिपळूणला आहे व मला बरेच जणांचे फोन येत आहेत कि शिरूर कासार येथे मेहबूब शेख यांच्या तक्रारीवर माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यावर भाष्य केलं म्हणून राज्यात माझ्यावर गुन्हा दाखल होतं असेल तर, असे दिवसाला १०० गुन्हे दाखल करा पण मी बोलत रहाणार.. लडेंगे..जितेंगे.
औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाºया एका अल्पसंख्याक तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले.
10 नोव्हेंबर रोजी मला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावलं आणि 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भेटण्याच्या उद्देशाने गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती.
त्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत मेहबूब यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती. जर एखादा सर्वसाधारण आरोपी असता तर तर त्याला लगेच अटक केली असती मग आता राजकीय पदाधिकाºयाला आणि विशेष म्हणजे सत्तेतील पक्षातल्या एका पदाधिकाऱ्याला वेगळा न्याय का? औरंगाबाद पोलिसांनी पीडितेला न्याय मिळवून द्यावा आणि आरोपीला जेरबंद करावं, अशी मागणी त्यांनी केली होती. शिवछत्रपतींचा महाराष्ट्र फक्त बोलण्यात नको तर आचरणातही हवा, असे त्यांनी म्हटले होते.
Chitra Wagh has been charged with defamation for allegeing raping the president of the Nationalist congress Youth Front president
महत्त्वाच्या बातम्या
- इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी याचिका फेटाळली, प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी म्हणत याचिकाकर्त्याला दहा हजार रुपयांचा दंड
- झाशीच्या राणीला योगी आदित्यनाथांचे अभिवादन, झाशी रेल्वे स्टेशनला देणार वीरांगणा लक्ष्मीबाई यांचे नाव
- कंगाल पाकिस्तान : आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकने पंतप्रधानांचे निवासस्थान काढले भाड्याने, गेस्ट हाऊसपासून लॉनपर्यंत रेंटने मिळणार
- आता मध्य प्रदेशात पावसाचा कहर : पुराच्या विळख्यात 1171 गावे, बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण