• Download App
    चिंचवड पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचे बंडखोर राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा; राष्ट्रवादीला डोकेदुखी Chinchwad potnivadanukit thackeray gatache bandkhor rahul kaltena vanchitcha support

    चिंचवड पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचे बंडखोर राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा; राष्ट्रवादीला डोकेदुखी

    प्रतिनिधी

    चिंचवड : चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सरळ लढत होणार होती. इथे राष्ट्रवादी समोर नवे आव्हान उभे राहिले आहे आधी शिवसेनेच्या ठाकरे गटाने हे आव्हान उभे केले त्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने त्या आव्हानात भर टाकली आहे. Chinchwad potnivadanukit thackeray gatache bandkhor rahul kaltena vanchitcha support

    राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे हे निवडणुकीत उभे असून ते महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे घोषित झाले आहे. मात्र या ठिकाणी ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी घेतल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली असताना आता ठाकरे गटासोबत युती केलेल्या वंचित बहुजन आघाडीने थेट ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केल्याने राष्ट्रवादीची आणखी डोकेदुखी वाढली आहे.

    वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा 

    त्याबाबच पत्रक काढून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली आहे. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. खरे म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

    त्यामुळे राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी स्वतः उद्धव ठाकरे, अजित पवार, सचिन अहिर या नेत्यांनी विनंती केली होती. मात्र, राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून माघार न घेता आता वंचितचा पाठिंबा मिळवला आहे. राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडीकडे पाठिंबा मागितला होता. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीने तो पाठिंबा पत्रक काढून दिला आहे. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आहे आणि त्यात ठाकरे यांच्यासोबत वंचितची युती आहे.

    Chinchwad potnivadanukit thackeray gatache bandkhor rahul kaltena vanchitcha support

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!