• Download App
    ठाण्याची चिमुकली सायली पाटील, वय अवघे १० वर्षे अन् सायकलवरून केला ४ हजार किलोमीटर प्रवास । Chimukli Sayali Patil of Thane, only 10 years old, traveled 4,000 kilometers by bicycle

    ठाण्याची चिमुकली सायली पाटील, वय अवघे १० वर्षे अन् सायकलवरून केला ४ हजार किलोमीटर प्रवास

    सायली ही काश्मीर ते कन्याकुमारी असा एकूण ४ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. तिने आतापर्यंत २२०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला. Chimukli Sayali Patil of Thane, only 10 years old, traveled 4,000 kilometers by bicycle


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : ठाण्यातील चिमुकलीने वय अवघे १० वर्षे अन् ४ हजार किलोमीटर प्रवास तोही सायकलवरून सुरू केला आहे. काल सातारा येथे सायली पाटील हिचे खासदर उदयनराजे भोसले यांनी स्वागत केले. तसेच यावेळी सायलीचे अभिनंदन करत फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी वाट्टेल ती मदत करण्याचे आश्वासनही उदयनराजे भोसले यांनी दिले.केवळ अवघे १० वय असलेल्या सायलीच्या या जिद्दीचे सध्या काैतुक होत आहे.



    सायली पाटील हिने काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकलवरून प्रवास सुरू केला आहे. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हा संदेश घेऊन ती साताऱ्यात आली. सायली ही काश्मीर ते कन्याकुमारी असा एकूण ४ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

    तिने आतापर्यंत २२०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला असून अजून १८०० प्रवास शिल्लक आहे. राहिलेला प्रवास १८ दिवस पूर्ण करण्याचा सायलीचा मानस आहे.काल २३ व्या दिवशी ती साताऱ्यात पोहचली तेव्हा तिचे जंगी स्वागत करण्यात आले.

    Chimukli Sayali Patil of Thane, only 10 years old, traveled 4,000 kilometers by bicycle

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ