• Download App
    मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; दोन शिवसेनांमधला संघर्ष आणखी उफाळणार Chief Minister's order to investigate scams in Mumbai Municipal Corporation

    मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; दोन शिवसेनांमधला संघर्ष आणखी उफाळणार

    प्रतिनिधी

    मुंबई : ऑडिटर अँड कंट्रोलर जनरल अर्थात कॅगच्या अहवालात ज्या अनियमिततांचा उल्लेख आहे, त्या सर्व अनियमितता अर्थात घोटाळ्यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती मुंबई महापालिकेतील या घोटाळ्यांची चौकशी करणार आहे. मुंबई महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन शिवसेनांमधला संघर्ष या निमित्ताने आणखी उफाळणार आहे. Chief Minister’s order to investigate scams in Mumbai Municipal Corporation

    मुंबई महापालिकेत अखंड शिवसेनेची सत्ता होती. महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष शिवसेनेचे होते. कोरोना काळात कोविड हॉस्पिटल्स उभारणी अत्यंत वादग्रस्त विषय ठरला होता. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हा विषय ऐरणीवर आणला होता. यात संजय राऊत यांचे निकटवर्ती अडकल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

    त्याचबरोबर मुंबई महापालिका परिक्षेत्रातील विविध रस्त्यांची कामे तसेच आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील वेगवेगळ्या विकास योजना यात घोटाळे झाल्याचा आरोपही सोमय्या यांच्यासह भाजपा आमदार आशिष शेलार आणि अन्य नेत्यांनी केला होता.

    आता हे सर्व घोटाळे मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या स्कॅनर खाली येतील. यातून दोन शिवसेनांमध्ये मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

    कोरोना काळातील महापौर किशोरी पेडणेकर या आजही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत, तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले आहेत. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. मुंबई महापालिकेतील अनियमततांसंदर्भात अहवाल आणि त्या पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी केलेली चौकशीची घोषणा यातून दोन शिवसेनांमधला संघर्ष उफाळून येणार आहे.

    Chief Minister’s order to investigate scams in Mumbai Municipal Corporation

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    उंट आया पहाड के नीचे; दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत भाजपशी बोलावे लागेल; सुनील तटकरेंची कबुली!!

    Legislature Session : विधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजले; 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन; मुख्यमंत्र्यांनी हनीट्रॅपचा आरोप फेटाळला

    Shinde Slams Thackeray : शिंदेंची ठाकरेंवर टीका- 3 वर्षांपासून फक्त शिव्या-शाप सुरू; एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही