प्रतिनिधी
मुंबई : मागच्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असून, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या विरोधात राज्यातील विरोधक आक्रमक झाले आहेत. तर शेतकऱ्यांनीही अनेक ठिकाणी आंदोलने केली आहेत. यानंतर आता राज्य सरकारने कांद्याला 300 रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या संदर्भात घोषणाही केली आहे. Chief Minister’s big announcement; 300 per quintal subsidy on onion
कांद्याचे भाव पडले. त्यामुळे विरोधकांनी केंद्र आणि राज्य सरकारला सातत्याने घेरले होते. प्रत्यक्षात कांदा निर्यात बंदी नसताना कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यांना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी परखड शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले होते.
पण या राजकारणा पलीकडे जाऊन कांद्याचे भाव पडले होते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
Chief Minister’s big announcement; 300 per quintal subsidy on onion
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद! भारताच्या मदतीने तब्बल ४० लाख श्रीलंकन मुलांचे शिक्षणाचे स्वप्न होत आहे पूर्ण
- लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावरील कारवाईमुळे नितीश कुमार सर्वाधिक खूश : सुशील मोदी
- शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडिओ : किती खाली पडाल रे, वरुण सरदेसाईंना टॅग करत नरेश म्हस्केंचे ट्वीट
- मोदी कर्नाटकात, अमित शाह केरळात; राजकीय भूकंप आंध्रात, माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डींचा काँग्रेसचा राजीनामा!!