• Download App
    Mahavikas Aghadi काल शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाच्या गर्जना, प

    Mahavikas Aghadi : काल शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाच्या गर्जना, पडद्यावरती जुनी शपथ; आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत पवार + नानांसमोर शेपूट!!

    Mahavikas Aghadi

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Mahavikas Aghadi :  काल दसरा मेळाव्यानिमित्त शिवतीर्थावर उबाठा शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या गर्जना केल्या. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या शेवटी मागच्या भव्य पडद्यावर 2019 चे मुख्यमंत्री पदाची शपथ दाखवली, पण आज महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मात्र शरद पवार आणि नाना पटोले यांच्यासमोर शिवसेनेने शेपूट घातली, असेच चित्र दिसले!!Mahavikas Aghadi

    महाविकास आघाडीने आज ताज हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचे जोरदार वाभाडे काढले. शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा राजीनामा मागितला. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले आदित्य ठाकरे वर्षा गायकवाड हे नेते हजर होते. सगळ्यांनी एकमुखाने शिंदे – फडणवीस सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली.



    मात्र, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा प्रश्न विचारताच उद्धव ठाकरेंनी सुरुवातीलाच तो चेंडू महायुतीकडे टोलवला. महायुती गद्दार आणि चोरांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार का??, त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार का??, हे पहिले त्यांना विचारा. मग आम्ही आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला शरद पवार आणि नाना पटोले यांनी आमचेही तेच मत आहे, असे सांगून दुजोरा दिला.

    मात्र, कालच सायंकाळी शिवतीर्थावर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होतील. दोन महिन्यानंतर याच शिवतार्थावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विजय मेळावा घेऊ, असे जाहीर केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सगळ्याच शेवटी 2019 चा शपथविधी समारंभ मागच्या स्क्रीनवर दाखवला. यातून शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरचा आपला दावा महाविकास आघाडीत लादायचा प्रयत्न केला होता. पण आजच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नाचा चेंडू महायुतीच्या दिशेने टोलवून शरद पवार आणि नाना पटोले यांच्यासमोर शरणागती पत्करली.

    Chief ministerial roars on Shivtirtha yesterday, old oath on screen; Pawar + Nana in front of press conference of Mahavikas Aghadi today!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा