अजितदादांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा आहे खरी, पण ती पूर्ण करायला “मोदींचा भाजप” बांधील आहे का??, या शीर्षकातले “अजितदादांची महत्त्वाकांक्षा” यापेक्षा “मोदींचा भाजप” हे शब्द अधिक महत्त्वाचे आहेत!! Chief ministerial ambition of ajit pawar; will Modi BJP fulfill it??
अजितदादांनी 5 जुलै 2023 रोजीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आपली मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा उघडपणे बोलून दाखवली. काही विशिष्ट योजना महाराष्ट्रात राबविण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे आहे. पाच वेळा आपण उपमुख्यमंत्री झालो, आता मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे अजितदादा म्हणाले.
लोकशाही तत्त्वानुसार भारतीय नागरिकांना कोणत्याही पदावर जाण्याचा अधिकार आहे. त्यानुसार अजितदादांनी मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर करणे यात काही गैर नाही. पण ज्यावेळी अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचा महत्वाकांक्षेचा मुद्दा येतो, तेव्हा मोदींच्या भाजप अजितदादांची ती महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी बांधील आहे का??, हा सर्वात कळीचा प्रश्न ठरतो.
कारण अजितदादांनी मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर केल्याबरोबर मराठी माध्यमांनी पवारनिष्ठ नॅरेटिव्ह चालवत अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची तारीख देखील जाहीर करून टाकली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे 15 आमदार अपात्र होतील. त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि त्यानंतर 11 ऑगस्टला अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, असे मराठी माध्यमांनी जाहीर करून टाकले.
पण अजितदादा सध्या मोदींच्या भाजपच्या पाठिंब्याने शिंदे – फडणवीस सरकार मध्ये आले आहेत. त्यांना मोदींच्या भाजपने उपमुख्यमंत्री केले आहे, ही राजकीय वस्तुस्थिती विसरले. या पार्श्वभूमीवर “मोदींचा भाजप” आणि राष्ट्रवादीतील फूट यांची नेमकी सांगड घातली की अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेचे काही राजकीय पदर उलगडता येऊ शकतील.
मूळात एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री करणे किंवा न करणे किंवा त्या व्यक्तीची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे ही मोदी आपल्या भाजपची जबाबदारीच मानत नाहीत. अजितदादांना मुख्यमंत्री करण्याच्या हेतूने भाजपने राष्ट्रवादी फोडलेली नाही. राष्ट्रवादी फोडणे हा भाजपच्या “मेगा प्लॅन” मधला एक “छोटा प्लॅन” आहे.
तसाही मी मुख्यमंत्री होईन, अशी महत्त्वाकांक्षा जाहीर केलेला मुख्यमंत्री झालाचा महाराष्ट्राचा इतिहास नाही. त्यातही जेव्हा मोदींच्या भाजप बरोबर डील करून एखादा नेता कोणत्याही पदावर जातो, तेव्हा त्याची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा काही उरू शकते!!, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण “मोदींच्या भाजपचा” तसा इतिहास नाही. मोदींनी कधीच फार मोठी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा असलेल्या नेत्यांना फारसे कधी हवेत उडू दिल्याचा इतिहास नाही. अशा स्थितीत अजितदादांची जाहीर केलेली मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करतील, याची शक्यता किती आहे??, याचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे.
अजितदादांनी मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जरूर जाहीर केली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेच्या 90 जागा लढवणार असल्याचे त्यांनी परस्पर जाहीर केले आहे. ज्यांच्या राष्ट्रवादीला भाजप महाराष्ट्रात फक्त 90 जागा निवडणूक लढवायला देणार आहे, त्यांचे नेते मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा बाळगून आहेत हे मोदींच्या भाजपच्या धोरणाशी पूर्ण विसंगत आहे. मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर करून टाळ्या मिळवणे निराळे आणि प्रत्यक्षात ती महत्त्वाकांक्षा बहुमताच्या आधारे स्वकर्तृत्वावर पूर्ण करणे निराळे!!
गुजरातचे उदाहरण
याचे महत्त्वाचे उदाहरण गुजरातमधले देता येईल. मोदींनी गुजरातमध्ये भाजपसाठी बहुमत खेचून आणले. सलग पाच निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळवता आले. पण मुख्यमंत्री बदलात मात्र मोदींनी अशा काही खेळी केल्या, की कोणतेही रेसमध्ये नसलेले नाव भूपेंद्र पटेल यांच्या रूपाने त्यांनी पुढे आणले आणि त्यांना मुख्यमंत्री केले. “सरप्राईज एलिमेंट” हे मोदींच्या राजकारणाचे वैशिष्ट्य आहे. ज्याला सर्वसाधारण भाषेत धक्का तंत्र म्हणतात. मोदी गुजरातमध्ये जर ते धक्का तंत्र वापरू शकतात, तर महाराष्ट्रात का नाही?? हा प्रश्न देखील अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाची तारीख जाहीर करणाऱ्या माध्यमांना पाडला नाही. यातून त्यांची “राजकीय बुद्धी” किती “तीव्र” आहे!!, याचीच दिसते चुणूक दिसते.
अजितदादांचा “राजकीय साईज”
पण त्या पलीकडे जाऊन खरंच अजितदादांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे ही भाजपची जबाबदारी आहे का??, हाही कळीचा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर “नाही” या एकाच शब्दात देता येऊ शकते. अजित दादांच्या आमदारांचे संख्याबळ आजतरी निश्चित नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार बळ 50 एवढे निश्चित आहे. त्यामुळे अजितदादा आज तरी भाजप शिवसेना युतीतले संख्याबळाच्या आधारे तिसऱ्या क्रमांकाचे घटक पक्ष आहेत.
मोदी विरोधात जाण्याची अजितदादांची आता हिंमत आहे का??
अजितदादांनी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा स्वतःच्या बहुमताच्या बळावर पूर्ण करून घ्यावी, असा पंतप्रधान मोदींकडून थेट “मेसेज” तर सोडाच पण साधा “फिलर” अजितदादांपर्यंत पोहोचवला, तर अजितदादा आत्ता काय करू शकतील?? येत्या काही वर्षात मोदी विरोधात जाण्याची त्यांची राजकीय हिंमत तरी आहे का?? अजितदादांच्या राजकीय व्यवहारात ते बसू शकते का?? भले राष्ट्रवादीला कोणतीही आयडियालॉजी नसेल, सत्तेच्या वळचणीला जाऊन बसणे हा एकमेव अजेंडा असणारा तो पक्ष असेल, पण म्हणून अत्यंत मर्यादित स्वबळ असताना कोणतीही महत्त्वाकांक्षा जाहीर करणे आणि ती “मोदींच्या भाजपकडून” पूर्ण करवून घेणे हे अजितदादांना शक्य होईल का??, हा सर्वात काळीचा मुद्दा आहे आणि याकडे अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची तारीख जाहीर करणाऱ्यांना जाहीर करणाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे किंबहुना ते त्यांच्या राजकीय आकलना पलीकडचे आहे!!
Chief ministerial ambition of ajit pawar; will Modi BJP fulfill it??
महत्वाच्या बातम्या
- Gurpatwant Singh Pannu: अमेरिकेत कार अपघातात खलिस्तानी दहशतवादी पन्नूचा मृत्यू झाल्याचा दावा!
- राष्ट्रवादीतले अधोरेखित 3 : 83 वर्षांचा योद्धा मैदानात; पण 54 वर्षांची योद्धा अजूनही “राजकीय कवचात”!!
- 69 वर्षांच्या ज्येष्ठ नेत्याला 64 वर्षांचे नेते निघाले होते, बैल बाजार दाखवायला!!; आज ते 83 वर्षांचे योद्धा आहेत!!
- ‘’…तर पेट्रोल १५ रुपये प्रतिलिटर मिळू लागेल’’, नितीन गडकरींचा नवा फॉर्म्युला!