• Download App
    मुख्यमंत्र्यांचे उद्गार संजय राऊत यांनी आपल्याला हवे तसे फिरवले; भाजपचे नेते महाविकास आघाडीत येतील असे म्हणाले Chief Minister words Sanjay Raut Rotate as you wish

    मुख्यमंत्र्यांचे उद्गार संजय राऊत यांनी आपल्याला हवे तसे फिरवले; भाजपचे नेते महाविकास आघाडीत येतील असे म्हणाले

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे “माझे भावी सहकारी” हे राजकीय उद्गार महाराष्ट्रात चांगलीच खळबळ माजवून आहेत. त्यांच्या या उद्गारावरून शिवसेना आणि भाजप हे पुन्हा एकत्र येण्याचे संकेत काही नेते देत आहेत. Chief Minister words Sanjay Raut Rotate as you wish

    परंतु, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र मुख्यमंत्री यांचे वक्तव्य आपल्या पद्धतीने फिरवून घेतले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा भाजपच्या नेत्यांकडे पाहून “माझे भावी सहकारी” असे म्हणतात, तेव्हा आपण हे समजून घेतले पाहिजे की भाजपचे काही लोक महाविकास आघाडीत येतील. आम्ही कोठेही जाणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.



    संजय राऊत वगळता शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर वक्तव्य केलेले नाही. उलट शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दोन वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जुळवून घेण्याचे आवाहन केले आहे.

    परंतु, संजय राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेली विशेष राजकीय जवळीक लक्षात घेता शिवसेनेने भाजपच्या जवळ जाणे हे संजय राऊत यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या धोकादायक ठरणार आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या पद्धतीत मुख्यमंत्र्यांचे विधान फिरवून पत्रकारांसमोर पेश केले आहे, अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    Chief Minister words Sanjay Raut Rotate as you wish

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस