• Download App
    मुख्यमंत्री महोदय, तुमचे फेसबुक लाईव्ह भावनिक, पण मूळ प्रश्नांची उत्तरे आहेत कुठे??; बंडखोर आमदार संजय शिरसाटांचे पत्र!! Chief Minister, where are your Facebook Live emotional, but answers to the basic questions

    शिवसेनेत फूट : मुख्यमंत्री महोदय, तुमचे फेसबुक लाईव्ह भावनिक, पण मूळ प्रश्नांची उत्तरे आहेत कुठे??; बंडखोर आमदार संजय शिरसाटांचे पत्र!!

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी : मुख्यमंत्री महोदय, तुमचे फेसबुक लाईव्ह फारच भावनिक होते. पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरे कुठे दिलीत?, असा परखड सवाल करत एकनाथ शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. Chief Minister, where are your Facebook Live emotional, but answers to the basic questions

    महाराष्ट्राच्या राजकारणात जो सत्ता नाट्याचा थरार सुरु आहे. त्यातच आता शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना एक खरमरीत पत्र लिहून, आमदारांना मागच्या अडीच वर्षांत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. अडीच वर्षे आमच्यासाठी वर्षा बंगल्याची ची दारे बंद होती. अनेकदा तासनतास आम्हाला वर्षाच्या गेटवर वाट बघायला लागली, असा आरोप शिरसाट यांनी पत्राद्वारे केला आहे.

    पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

    •  काल वर्षा बंगल्याची दारे ख-या अर्थाने सर्वांसाठी खुली झाली. पण शिवसेना आमदार म्हणून आमच्यासारख्यांना गेल्या अडीच वर्षांपासून दारे बंद होती
    •  यापूर्वी दार उघडण्यासाठी बडव्यांची मनधरणी करावी लागत होती.
    •  हेच चाणाक्य कारकून राज्यसभा, विधान परिषदेची रणनीती ठरवत होते.
    •  राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आमदारांची कामे होत होती ते निधी मिळाल्याची पत्रे आमच्या समोर नाचवत असत.
    •  पण शिवसेनेचे स्वपक्षीय आमदार म्हणून आम्हाला कधीच वर्षा बंगल्यावर प्रवेश मिळाला नाही.
    •  आम्हाला अयोध्येत का जाऊ दिले नाही?

    हिंदुत्व, अयोध्या, राममंदिर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखले?? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमातळावरुन निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहका-यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करुन सांगितले की, आमदारांना अयोध्येत जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वत: परत घेऊन या. निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर अविश्वास का दाखवलात?? असा प्रश्न शिरसाट यांनी पत्राच्या माध्यमातून विचारला आहे.

    Chief Minister, where are your Facebook Live emotional, but answers to the basic questions

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल