विशेष प्रतिनिधी
अमरावती : अमित शहा यांची भेट घेतल्यावर आम्हाला प्रेरणा मिळते. जिथे लोकांची विचारसरणी संपते, तेथून त्यांचा विचार सुरू होतो. 370 कलम हटवून त्यांनी जम्मू-काश्मीरला स्वतंत्र बनवले. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण केले. एवढंच नाही ते एखाद्याला मदतीचा हात देतात तेव्हा ते त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांची अनुभूती मला देखील आहे. अमित भाई कोणालाही बंददाराआड शब्द देत नाहीत, ते उघडपणे बोलतात. पण सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडणारे, हिंदुत्वाचा गळा घोटणाऱ्यांना अमित भाई कधीही माफ करत नाहीत, त्यांना सोडत देखील नाहीत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.Chief Minister Shinde’s attack on Thackeray, Amit Bhai does not give a word behind closed doors and does not release those who strangle Hindutva for power.
श्रीनगरमध्ये महाराष्ट्र सदन होणारच?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईत काही दिवसांपूर्वी ओमर अब्दुला आले होते त्यांनी सांगितले की, श्रीनगरमध्ये आम्ही महाराष्ट्र सदन होऊ देणार नाही. मग आम्ही देखील पाहू त्या ठिकाणी महाराष्ट्र सदन कसे होत नाही. कारण आमच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आहेत. जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन होणारच, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
राहुल गांधींनी विदेशात जाऊन देशाची बदनामी केली
एकनाथ शिंदे म्हणाले की, पुन्हा एकदा मोदी सरकार बनवण्याचा निर्धार देशातील लोकांनी केला आहे. मोदींच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी अमित शहा यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था मोदीजींनी बाराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली. तर येत्या काळात तिसऱ्या स्थानावर देशाची अर्थव्यवस्था आणणार आहेत. तर दुसरीकडे विदेशात जाऊन देशाची बदनामी करणारे राहुल गांधी कुठे आणि संपूर्ण विश्वात स्वतःचा व भारताचा डंका वाजवणारे मोदीजी कुठे? असे म्हणत शिंदे यांनी गांधींवर हल्लाबोल केला.
महाराष्ट्रात असे सरकार होते की, नवनीत राणा व रवी राणा यांना हनुमान चालिसा म्हणण्याास देखील परवानगी देत नव्हते. त्यांना 14 वर्षे जेलमध्ये टाकले गेले, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करताच अमरावतीच्या सभेत हशा पिकला. मंचावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमरावतीच्या लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा देखील हसायला लागले. तेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पाठिमागून सांगताच व शिंदेंना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी 14 दिवस राणा दाम्पत्यांनी जेलवारी भोगली असे म्हटले. तर हमारी बहन 14 साल तक भी जेलमध्ये राहिली असती, असेही त्यांनी पुढे म्हटले.
Chief Minister Shinde’s attack on Thackeray, Amit Bhai does not give a word behind closed doors and does not release those who strangle Hindutva for power.
महत्वाच्या बातम्या
- कर्मवीरांची रयत शिक्षण संस्था पवारांनी बळकावली; उदयनराजेंचा साताऱ्यातून थेट हल्लाबोल!!
- पवारांची मानभावी माफी त्यांच्यावरच उलटली; अमरावतीत शाह – फडणवीसांनी सादर केली पवारांच्या चुकांची यादी!!
- मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ
- तुम्ही काँग्रेसला मतदान करा किंवा करू नका, निदान माझ्या अंतयात्रेला तरी या; कलबुर्गीच्या मतदारांवर मल्लिकार्जुन खर्गेंचा वैताग!!