• Download App
    शिवराज्याभिषेक दिनी मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची जबाबदारी; उदयनराजे प्रतापगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदीChief Minister gave an important responsibility on the day of Shivarajabhishek; Udayanraje as Chairman of Pratapgad Authority

    शिवराज्याभिषेक दिनी मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची जबाबदारी; उदयनराजे प्रतापगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी

    प्रतिनिधी

    मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे ३५० वे वर्ष आहे. हा ३५०वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर दिमाखात साजरा केला जात आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा करत खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे एक मोठी जबाबदारी दिली आहे. प्रतापगड प्राधिकरणांची मुख्यमंत्र्यांनी घोषणा करत उदयनराजे यांच्याकडे या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.Chief Minister gave an important responsibility on the day of Shivarajabhishek; Udayanraje as Chairman of Pratapgad Authority



    रायगडावर साजरा होत असलेल्या राज्याभिषेक सोहळ्यात शिवप्रेमींना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘शिवरायांच्या पराक्रमामुळे अखंड भारताला सुखाचे क्षण अनुभवता आले. आपल्या माता भगिनींच जगणं सुसह्य झालं. साधुसंत, धर्म, देवळाचं रक्षण झालं. म्हणूनच आजचा हा सोहळा पाहतोय. हा सोहळा म्हणजे शिवरायांच्या चरणी अर्पण केलेली पूजा आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आमच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांना न्याय देणार आहे, रयतेच्या हक्काचं रक्षण करणारं आहे अशा प्रकारची सुरुवात आम्ही केली होती. आज आपण पाहताय, ११ महिने सरकार काम करतंय आणि प्रत्येक निर्णय आपल्या साक्षीने घेतय. हे निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी आहेत, त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आहेत, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आहेत आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. शिवछत्रपतींसाठी गडकोट किल्ले हे जीव की प्राण होते, म्हणूनच आम्ही त्या गडकोट किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाला प्राधान्य देतोय. एक दुर्ग प्राधिकरण देखील आपलं सरकार करतंय. उदयनराजेंची जी मागणी आहे की, प्रतापगड प्राधिकरण करावं. ते आज मी या ठिकाणी जाहीर करतो की या प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून उदयनराजे भोसले असतील.’

    पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आज लंडनच्या संग्रहालयातील भवानी तलवार आणि वाघनख महाराष्ट्रात परत आणण्याचाही आपल्या सरकारचा प्रयत्न आहे. सुधीर मुनगंटीवार त्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी पंतप्रधान मोदी मदत करतील आणि त्यामुळे आपलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.’

    Chief Minister gave an important responsibility on the day of Shivarajabhishek; Udayanraje as Chairman of Pratapgad Authority

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!